
प्रतिनिधी…. परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर दतालुक्यातील मौजे पळसपुर येथील नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजुर झालेल्या घरकुल बांधकामासाठी लागणारि वाळु उपलब्ध करून देण्यासाठी आज पळसपुर येथील नागरिकांनी हिमायतनगर तहसीलदार गायकवाड यांच्याकडे ऐका निवेदनाद्वारे वाळू ऊपलब्ध करून देण्यासाठी मागणी केली आहे
तालुक्यातील पळसपुर येथील नागरिकांना शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेंअंतर्गत राहण्यासाठी २६ लाभार्थयांना घरकुल मंजूर झाले परंतु वाळू नसल्याने बांधकाम रखडले आहे
निवेदनात असे म्हटले आहे की
आमच्या गावाला लागूनच पैनगंगा नदी वाहते या ठिकाणाहुन घरकुल बांधकामासाठी लागणारी वाळू अंदाजे १०ब्रास रेती(वाळू ) शासनाने नियमा प्रमाणे पावती देऊन आम्हाला घरकुल बांधकाम करण्यासाठी वाळू ऊपलब्ध करून देण्यासाठी
यावेळी घरकुल लाभार्थी पार्वताबाई संभाजी शिंदे, रमेश दिगांबर माने, नारायण वानखेडे भगवान महागावकर, संतोष देवसरकर, पांडुरंग गायकवाड रावसाहेब वानखेडे, सुरेश कदम, नागोराव कोमलवार, साहेबराव जाधव,प्रभाकर वानखेडे, पांडुरंग देवसरकर,रधुनाथ वानखेडे, मारोती संभाजी शिंदे, नारायण संभाजी वानखेडे, ,जगदेराव कदम यांच्या सह लाभार्थ्यांच्या सहिने तहसीलदार हिमायतनगर हिंगोली लोसभेचे खासदार श्री हेंमत पाटील ,हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार श्री माधवराव पाटील जवळगावकर गटविकास अधिकारी सुधीश मांजरमकर यांना निवेदन देण्यात आले आहे
