
प्रतिनिधी:उमेश पारखी,राजुरा
राजुरा: श्री शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा . महाविलयातील विद्यार्थांना आपल्या कला गुणांना चालना मिळावी यासाठी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही वादविवाद स्पर्धा कोविड-१९ मुळे आभासी पद्धतीने (म्हणजेच ऑनलाईन) दिनांक १७ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२० या कालावधीत घेण्यात आली .तसेच २५डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या संकेत स्थळावर निकाल जाहीर करण्यात आला या स्पर्धेत महाविद्यायातील वेगवेगळ्या शाखेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला .या चुरशीच्या स्पर्धेत विषयाच्या विरूद्ध बाजूने सिद्धार्थ चव्हाण प्रथम ,प्रतीक्षा वासनिक व्दितीय तर विषयाच्या बाजूने नामदेव देवकाते प्रथम तर रोशन चने व्दितीय पुरस्काराचा मानकरी ठरला.
या स्पर्धेचे आयोजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस. एम . वारकड तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ संजय लाटेरवर यांनी केले होते…
