पोलीस स्टेशन भिशी येथे दि. 25/12/2020 रोजी रक्तदान शिबिर आयोजित

प्रतिनिधी:गुरुदास धारने,चिमूर

श्री.अरविंद साळवे, पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात व श्री नितिन बगाटे सहाय्यक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी चिमूर विभाग यांचे संकल्पनेवरुन पो स्टे भिशी येथे दि. 25/12/2020 रोजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले.जीवन ज्योती हेल्थ केअर अँड रिसर्च ट्रस्ट नागपूर कडून जीवन ज्योती ब्लड बँक ची वैद्यकिय चमू व स्वयंसेवक यांचे संयुक्त सहकार्याने पोलीस स्टेशनच्या इमारतीमध्ये शिबिराला प्रारंभ केला असता, पो स्टे चे पोलीस अंमलदार,पोलीस पाटील,गावातील व परिसरातील हौशी तरुण असे एकूण 69 रक्त दात्यांनी रक्त दान करून आयोजित शिबीर यशस्वी केला व सायंकाळी 16/00 वा शिबिराची सांगता करण्यात आली. सध्या परीस्थितीत रक्तदात्यांची कमतरता लक्षात घेता चंद्रपुर जिल्हा पोलीस दलाचे वतीने प्रत्येक पाेलीस उपविभागात रक्तदान शिबीर आयोजित करुन सामाजिक कार्य करण्यात येत आहे.