
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी
आर्णी तालुक्यातील शिरपूर ग्रामपंचायत मध्ये मनसे चे तालुका संघटक सुरजभाऊ राठोड यांनी पैनल मार्फत निवडणूक लढविली व मनसेला ०७पैकी०६ जागेवर विजय मिळवून दिला.
शहरी भागात काम करणारी मनसेची ओळख पुसल्या गेली.यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १७ ग्रामपंचायतीवर मनसेचा झेंडा फडकला.त्यामुळे ग्रामीण भागातील महाराष्ट्र सैनिकांमध्ये उत्साह संचारला आहे.
१) विश्वनाथ रामलाल जाधव वार्ड३
२) गायत्री प्रकाश राठोड वार्ड३
३) पवन सुदाम राठोड वार्ड १
४) कविता श्रीदास राठोड वार्ड२
५) वर्षा सुधाकर मुनेश्वर वार्ड २
६) शिला हिरासिंग चव्हाण वार्ड १ विजयी उमेदवार शिरपूर ग्रामपंचायत आर्णी तालुका.
देवा शिवरामवार मनसे जिल्हाध्यक्ष, अनिल हमदापुरे, सचिन यलगंधेवार(तालुकाध्यक्ष मनसे),राहुल ढोरे(माजी शहराध्यक्ष मनसे)संदीप गाडगे(तालुकाध्यक्ष मनविसे)कपिल ठाकरे(शहराध्यक्ष मनसे) यांच्या मार्गदर्शनात मनसेची खिंड लढविली व यश मिळविले अशी प्रतिक्रिया सुरजभाऊ राठोड(तालुका संघटक)यांनी दिली आहे.
