
प्रतिनिधी:योगेश तेजे,वणी
यवतमाळ जिल्हातील वणी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीचा निकाल आज दिनांक 18 जानेवारी 2021 रोजी जाहीर करण्यात आला आणि हा निकाल जाहीर करण्याच्या अगोदर यवतमाळ जिल्हाधिकार्यांनी कोरोनाची स्थिती आणि गावातील शांततेची स्थिती लक्षात घेवुन आपले आदेश जाहीर केले होते तर तालुक्यात व जिल्हात कलम 144 अतर्गंत जमावबंदी कायदा लागु करण्यात आला त्यात कलम 144 नुसार विजयी उमेदवारांच्या गुलालबाजी व मिरवणुकीवर बंदी घालण्यात आली होती मिरवणुकीत 4 पेक्षा जास्त लोकांना भाग घेता येत नव्हते पण वणी तालुक्यातील 82 ग्रामपंचायतीत येणार्या काही गावात गुलालबाजी व मोठ्या संख्येत लोकांना एकञित करुन मिरवणुक काढण्यात आली तर त्यात फटाक्यांची आतिशबाजी करुन ध्वनी प्रदुषण करण्यात आले त्यामुळे गावातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आल्या सारखे वातावरण निर्माण झाले होते आणि जिल्हाधिकार्यांनी आदेशांची पायमल्ली झाली होती
