चेंडकापुर येथे कोरोनाचे तब्बल १२ रुग्ण आढळले, आरोग्य विभागासह पोलीस पथक दाखल

प्रतिनिधी:नितेश ताजने,वणी

वणी :

चेंडकापूर या छोट्याशा गावात १२ कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने प्रशासन खडबडून जागे झाले असुन गावात आरोग्य विभागासह पोलीस पथक दाखल झाले आहे.
वणी तालुक्यातील वणी -मुकुटबन मार्गावरील चेंडकापूर या २०० लोकसंख्या असलेल्या छोट्याशा गावात पाच दिवसा पूर्वी एका महिलेला कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता, त्यांनतर तिच्या संपर्कात आलेल्या लोकांच्या चाचण्या केल्या असता तब्बल १२ रुग्ण आढळून आले आहे. पाच दिवसांनंतर आलेल्या रिपोर्ट मुळे आता निघालेले रुग्ण आणखी किती लोकांच्या संपर्कात आले हे तपासणी केल्या नंतरच कळेल.
प्रशासना जवळ तुटपुंजी व्यवस्था असल्याने पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना वणी तालुक्यातील परसोडा कोविड केंद्रात नेण्यासाठी अंबुलन्स उपलब्ध नसल्याने त्या रुग्णांना गावातीलच एका शाळेत कोरंटाइन करण्यात आले आहे. अनिल या गावातील मंजुर वर्ग ग्यास दुरुस्ती व कंगवा फनी केसाला पुघे हा वेवसाय खुप सारे लोक करतात अनेक खेड्यात जाऊन हा वेवसाय करतात आता मात्र प्रशाषक माञ विळख्यात दीसुन येत आहे