

लता फाळके / हदगाव
आकांक्षा कोचिंग क्लासेस येथे 72 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पावणे सर विस्ताराधिकारी शिक्षण विभाग , कै.घनश्याम राव
पाटील हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री.थाडके सर तसेच जिल्हा परिषद शाळा शिरड चे मुख्याध्यापक श्री गाभणे सर व गावातील निवृत्त शिक्षक माधवराव कल्याणकर सर व गावातील अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महात्मा बसवेश्वर सेवाभावी संस्था शिरड चे अध्यक्ष देवानंद कल्याणकर होते. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी भाषणे व गीत सादर केली.
