
प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी
आज राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टपिंपळगाव येथे मा.ना.श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब, अध्यक्ष-मराठा आरक्षण समिती हे आज साष्टपिंपळगाव आंदोलक यांचे मागण्याचे निवेदन स्विकारले आणि म्हणाले कि मी छत्रपती शिवाजीराजे यांची शपथ घेवून सांगतो मराठा आरक्षण हे मी मराठा समाजाला मिळवूनच देतो आणि आपल्या संपूर्ण मागण्या मा.ना.श्री. उध्दवजी साहेब ठाकरे यांच्याकडे उद्याच देतो आणि विजय वडेट्टीवार यांनी चुकीचे बोलले असून त्यांच्याबाबतही निर्णय घेवू कारण मराठा समाजात त्यांच्या चुकीच्या बोलण्यामुळे रोष निर्माण झाला आहे हे मी मुख्यमंत्री साहेबांकडे तक्रार समाजाच्या वतीने मांडतो… आण्णासाहेब महामंडळास भरिव निधी लगेच देण्यासाठी निर्णय घेवू… सारथी संस्था आणि त्यावरील निर्बंध उठवून जास्तीच्या निधीची मंजूरी देतोत… शासकीय मेगा
नोकर भरती आरक्षण निकाल लागेपर्यंत रद्द करण्यासाठी ताबडतोब मुख्यमंत्री साहेब यांच्याशी चर्चा करून रद्द करण्याचे आदेश काढले जातील… आपल्या साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलनाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी बैठक घेऊन मंजूरच केल्या जातील असे मा.ना.श्री. अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी जाहीर भाषणातून जनतेसमोर सांगितले आहे…
परंतु जोपर्यंत निर्णय प्रक्रिया पूर्ण केली जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणारच नाही असे राज्यव्यापी ठिय्या आंदोलन साष्टपिंपळगावच्या वतीने जाहिर करण्यात आले आहे.
