वृद्धांचे तारणहार सेवाव्रती शेषरावकाका डोंगरे

प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी


कसल्याही गोष्टीची अपेक्षा न धरता गेल्या 28 वर्षापासून मानव सेवेचे व्रत बाळगून वृद्ध सेवेत तल्लीन झालेला देव रुपी माणूस मी आदरणीय काकांमध्ये पहिला.
जेमतेम परिस्थिती असतांना देखील स्वतःचा धीर त्यांनी खचू दिला नाही.
प्रसंगी स्वतःच्या पत्नीच्या अंगावरील मंगळसूत्र व जोडवे सुद्धा विकायची वेळ त्यांच्यावर आली.
कोणत्याही परिस्थितीत वृद्धांची सेवा करणे त्यांनी सोडले नाही.
आजही माणुसकी जिवंत आहे.काकांसारखे व्यक्ती जोपर्यंत आहेत तो पर्यंत माणुसकीला काळिमा फासली जाणार नाही.
सेवा व सहकार्याची आवश्यकता आहे.त्यामुळे आपली माणुसकी जिवंत ठेऊन जी होईल ती मदत आपण सर्वांनी करायला हवी.खरंच या मानव जातीला तुमच्या मदतीची आवश्यकता आहे आणि आपले कर्तव्य सुद्धा आहे.जे होईल ते करण्याचा प्रयत्न आपण करायला हवा.
काकांना भेटून माझं आतापर्यंतच आयुष्य धन्य-धन्य झालं.मनाला खूप-खूप बरं वाटलं जिवंत माणुसकी पाहून. अतिशय सुखद अनुभव आला,या भेटी दरम्यान.
अतिशय सेवाभावी वृत्ती असलेले आमचे काका संचालक संत दोला महाराज वृद्धाश्रम उमरी पठार (जि.यवतमाळ).यांच्या सेवाभावी वृत्तीला शतशः नमन.
प्रतिनिधी:चंदन भगत,आर्णी