
प्रतिनिधी:पियुष भोगेकर, चंद्रपूर
इतक्यात चंद्रपूर शहरात एक प्रकरण खूप चर्चेला येत आहे. बिरसा मुंडा यांचा पुतळा कुठलीही पूर्वसूचना न देता मनपा प्रशासनाने हटवला. मोठा गाजावाजा करून लोकांकडून पैसे जमा केले आणि चंद्रपूर येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयाच्या गेट जवळ चंद्रपूर रेल्वे स्टेशन चौक ह्याठिकानी पुतळा उभारला. पुतळा 25 फेब्रु. या तारखेला रात्री बसविला ह्याची कल्पना बहुतेक मनपा प्रशासनाला नसावी आणि म्हणून लगेच 2 दिवसात म्हणजे 27 फेब्रु. या तारखेला मनपा प्रशासनाने तो पुतळा हटवून आपल्या ताब्यात घेतला. प्रशासनाला काय गरज पडली की पुतळा 2 दिवसात तिथून हटवाव लागलं? स्मारक संघटनेतील लोकांचा दावा होता की पुतळ्याची परवानगी मिळालेली आहे मग अस असतांना प्रशासनाने की कारवाही का केली? ह्यात नेमकं कोण काय लपवत आहे ह्याचा शोध व्हायला हवा. परवानगी असेल तर प्रशासन कारवाही करणार नाही आणि परवानगी नसेल तर प्रशासन ते होऊ देणार नाही. मग मुळात भूमिका चुकत कुणाची आहे?
चंद्रपूर नगरी ही गोंड राजघराण्याची राजधानी राहिली आहे. इथे गोंड प्रशासकाचा राज्यकारभार होता. प्रथम राज्यकारभार खांडक्या बल्लाड शाही आत्राम यांनी सांभाळला होता आणि इथला राज्यकारभार केला. गोंड राजवटीतील शेवटचा गोंड राजा हा नीलकंठ शाही आत्राम होता. त्यांनतर इथली राजवट संपुष्टात आली आणि गोंड राज्याच पतन झालं. इथे अन्य कुठल्याही जमातीचे वर्चस्व आणि राजवट राहिली नाही. ह्या चंद्रपूर शहराची वसाहत गोंड राजे बिरशाही आत्राम ह्यांच्या हत्येनंतर त्यांच्या पश्चात राज्यकारभार हाती घेतलेल्या राजमाता राणी हिराई आत्राम यांनी वसवली आहे. मग ही गोंड राजवटीची भूमी असतांना वारंवार आदिवासी राज्याचा राज्य कारभार होता अशाप्रकारचा कांगावा करणे कितपत योग्य आहे? कोणत्या आदिवासी राजाचे राज्यकारभार किव्हा सत्ता होती ह्याचे पुरावे संबंधित लोकांकडे आहे का? त्या लोकांना नेमकं चुकीचा इतिहास मांडून काय सिद्ध करायचं आहे?
देश इंग्रजांच्या गुलामगिरीत असतांना इथल्या मातीत ज्या शूरवीरांना वीरमरण आलं त्या शाहीदांचा विसर का पडला आहे? इथल्या भागावर ज्या गोंड राज्यांनी राज्य केलं त्यांचा का विसर पडला आहे? ज्यांनी ह्या सुंदर शहराची निर्मिती केली त्यांचा का विसर पडला आहे? जर इतक्या सर्व लोकांचा विसर पडला असतांना मधात बिरसा मुंडा यांचा पुतळा बसविण्याचा घाट काही लोकांनी घातला मग हा इथल्या भूमीपुत्रांचा अपमानच ना. कारण इथल्या स्थानिक वीरांना तुम्ही नाकारून वेगळ्या प्रदेशात ज्यांनी कार्य केले त्यांचा पुतळा ह्या प्रदेशात बसवत आहात मग हे कितपत योग्य आहे? इथल्या वीरांचं साध्या एका चौकाला नाव नाही देता आलं तुम्हाला आणि इतर जमातीच्या वीराला घेऊन नाचवत आहात. तुमच्या ना जमातीचा ना गोत्राचा मग त्यांचा इतका पुळका का आलाय? झारखंड सारख्या राज्यात बिरसा मुंडा यांचे असंख्य पुतळे असतील तसे ते महाराष्ट्रात देखील आहेत पण क्रांतिवीर बाबुराव पुल्लीसुर शेडमाके यांचे किती पुतळे झारखंड मध्ये आहेत ते सांगू शकाल का? बिरसा मुंडा यांची जयंती आणि पुण्यतिथी महाराष्ट्रात साजरी केली जाते मग झारखंड सारख्या राज्यात क्रांतिवीर बाबुराव पुल्लीसुर शेडमाके यांची जयंती आणि शाहिद दिन साजरा केला जातो का? तेथील लोकांना क्रांतिवीर बाबुराव पुल्लीसुर शेडमाके यांच्याबद्दल फारशी माहिती नाही तेथिलच काय इथल्या लोकांना पण जेमतेम माहिती आहे मग ही माहिती पुरवावी ह्यासाठी कधी प्रयत्न केले का? मग असले काही कार्य करू शकत नाही तर परराज्यातील बिरसा मुंडा यांना येथील लोकांवर थोपण्याचा अट्टाहास का करता? मनपा प्रशासनाने जी कारवाही केली बहुतेक ती योग्य असावी. त्यांना देखील परराज्यातील लोकांचं वर्चस्व ह्या भूमीवर मान्य नाही. मग येथील काही लोकांना का तसे उपद्रव करावे वाटत आहे ह्याची शहानिशा गोंड समाजातील लोकांनी करावी. आणि चुकीच्या वर्चस्वाचा पायंडा पडणाऱ्या लोकांना धडा शिकवावा. आणि अशा द्रोही लोकांच्या नादी लागून इथल्या भूमीपुत्रांचा इथल्या वीरांचा आणि गोंड राजवटीचा अपमान थांबवावा. अन्यथा हे लोक गोंड शासकाचा नाव नेस्तनाबूत करतील आणि इतर लोकांना गोंड समाजाच्या मानगुटीवर बसवून त्यांचं राज्य आणतील.
……जय सेवा जय गोंडवाना………
क्रांतिवीर बाबुराव शेडमाके ना सेवा सेवा…..!!
