भाजप महिला संघटन दौरा, मासळ येथे भेटी

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे, चिमूर

भारतीय जनता पार्टी महिला आघाडी तालुका अध्यक्ष सौ मायाताई ननावरे यांनी चिमूर तालुक्यातील महिला आघाडी मजबूत करण्यासाठी मासळ दौरा केला .

८ मार्च जागतिक महिला दिन औचित्य साधून महिला दिन आयोजित करण्याच्या संदर्भात दौरा करून चर्चा करण्यात आली श्री वामन बागडे यांचे निवासस्थानी भेट घेऊन मासळ जीप क्षेत्रातील महिला संघटन विषयी चर्चा करण्यात आली .

यावेळी सौ छायाताई कंचर्लावार सौ अलका बोरतवार, नाजमा शेख ,क
सौ भारती गोडे सौ तारकेश्वरी बांगडे , सौ मनीषा गराटे ,सौ संगीता सूर उपस्थित होत्या….