विद्यापीठाने विद्यार्थ्यांची आर्थिक लूट थांबवावी : अभाविप

प्रतिनिधी:पियुष भोगेकर

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाचे तसेच गोंडवाना विद्यापीठ संलग्नित प्रत्येक महाविद्यालयात पदवीदान समारंभ पार पडले. अश्यातच महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना त्याचा पदवी बहाल केल्या पण बऱ्याचश्या विद्यार्थ्यांच्या पदवी तसेच मार्कशीट मध्ये चुका आढळुन आल्या आहेत. सदर चुका दुरुस्ती करून देण्यासाठी दुरुस्ती शुल्क भरण्यासाठीचे विद्यापीठा कडून सांगितले जात आहे. सदर चूका ह्या विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांकडून झाल्या असून त्याचे शुल्क विद्यार्थ्यांकडून घेणे म्हणजे विद्यार्थ्यांची आर्थिक लूट करणे होय तसेच अव्यवहार्य देखील आहे तरी आपण सदर विषय लक्षात घेऊन पदवी मध्ये झालेल्या चुका आपण दुरुस्ती करून द्याव्यात जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही व विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल व विद्यार्थ्यांनकडून होणारी आर्थिक लूट थांबवावी अशी मागणी अभाविप गडचिरोली कडून परीक्षा नियंत्रक डॉ. अनिल चिताळे यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देतांना अभाविप जिल्हा संयोजक अंकुश कुनघाडकर, कार्यालय मंत्री स्वप्नील सातारे, जिल्हा संघटनमंत्री शक्ति केराम, डेव्हिड हुलके, अंकित सुरपाम, अजय अलाम, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.