हिमायतनगर महसुल प्रशासनाच्या आशिर्वादाने चालतो वाळू तस्कराचा चालतो गोरख धंदा तेजीत,जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी

प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी, हिमायतनगर


हिमायतनगर ( प्रतिनिधि) तालुक्यातील कार्यालयाकडून रेती घाटाची शासनाची कसलीही परवानगी नसताना हिमायतनगर तालुक्यात मागील काही दिवसापासून अवैध रेतीवाहतुक मोठ्या प्रमाणावर चालू आहे.काल दिघी पेंडावर वाळू तस्करांनी दिवसा तीन चार ट्रक्टर ने धुमाकूळ घातला
दिघी येथुन,ट्रँकटरने दिवस-रात्र वाळुची तस्करी चालु असल्याचे महसूल प्रशासनाला माहिती असुन सुद्धा कार्यवाही करत नाही.

तालुका महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून एक-दोन कार्यवाही केल्या आसल्या तरी प्रशासनाच्या या थातुरमातुर कार्यवाहीवर रेती माफियांनी आपला गोरखधंदा थांबवायला तयार नाहीत तर खालील म्हणी प्रमाणे “तुम्ही मारल्या सारख करा ! आम्ही रडल्या सारखे करु !!” काहिशा प्रकार घडत आहे.यामुळे प्रशासनाचा रेतीमाफियांना बाहेरून पांठीबा आहे का ? असा सवाल तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद देवसरकर यांनी हप्ते घेऊन वाळू माफिया वर कृपा दृष्टी ठेवतात असा आरोप केला .गेल्या आठवड्यात डोल्हारी येथून वाळू तस्करी होत असल्याने विदर्भातील बिटरगाव पोलिस श्टेशनने अवैध रेती उपसा व अवैध रेतीवाहतुक रोखण्यासाठी,अवैध वाहतुकीचे साधने जप्त करुण कार्यवाही केली.
परंतु मराठवाड्यातील प्रशासन मात्र हप्ता चालु असल्याने कार्यवाही करण्यास धजत नाहीत.यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुलास अक्षरशा चुना लागत आहे.
या अवैध रेती वाहतुकीवर मा.उपजिल्हाधिकारी, उपविभागीय पोलिस अधिकारी,जिल्हाधिकारी,पोलिस अधीक्षक साहेबांनी लक्ष घालुन कठोर कार्यावाही करून सबंधित रेतीमाफियांवर गुन्हे दाखल करुन रेती तस्करी थांबवावि व शासनाचे कोट्यावधीची होणारे नुकसानीस आळा घालावा अशी मागणी पर्यावरण प्रेमी नागरिकांन मधून होत आहे.