
हदगाव तालुक्यातील लिंगापूर येथे कोरोनाव्हायरसच्या प्रादुर्भावाने हाहाकार माजवला असून आठशे लोकसंख्येचे गाव असलेल्या छोटया गावात तब्बल एकाच दिवशी 29 रुग्ण आढळले आहेत,यामुळे एकच खळबळ उडाली असून गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आढळलेल्या रुग्णांवर तातडीने उपचार करण्यासाठी त्यांना कोविड सेंटरमध्ये हलवावे व गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी ग्रामपंचायतने विशेष उपाययोजना कराव्यात अशी आग्रही मागणी तालुका प्रशासनाकडे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेचे प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.
लिंगापूर येथे काल आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी गावातील नागरिकांच्या केलेल्या rt-pcr चाचणीमध्ये आज तब्बल 29 जण कोरोना पॉंझिटीव्ह रुग्ण आढळून आले, कोरोणा बाधित रुग्णांवर तातडीने कोविडं सेंटरमध्ये उपचार करून गावामध्ये आवश्यक ती पावले तातडीने उचलावीत जेणेकरून गावामध्ये कोरोनाचा प्रादुर्भावाचा फैलाव होणार नाही याची काळजी ग्रामपंचायत त्वरित घ्यावी मागील अनेक दिवसापासून ग्रामपंचायतच्या अक्षम्य दुर्लक्षामुळेच गावात कोरोणाचा इतका मोठा फैलाव झाला आहे,गावात कोरोणामुळे मृत्यू होऊनही ग्रामपंचायत,आरोग्य विभाग,व प्रशासन जागे झाले नाही, ग्रामसेवक आरोग्य कर्मचाऱ्यांनी कुठलीही योग्य ती खबरदारी किंवा काळजी घेतली नाही त्यामुळेच गावातील कोरोनाचे रुग्ण वाढले असून ग्रामपंचायतचा ग्रामसेवक व आरोग्य कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांची जवाबदार आहेत,गावात आरोग्य उपकेंद्र असूनही आरोग्य कर्मचाऱ्यांकडून कुठल्याही आरोग्य बाबतींत सेवा मिळत नाहीत याबाबत तालुका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून गावात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी विशेष प्रयत्न करावेत व गावातील नागरिकांनीही वाढत्या कोरोना प्रादुर्भावच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घेऊन शासनाच्या कोरोणा बाबतीतचे सर्व नियम पाळवेत,घराबाहेर जाण्याचे टाळावे व आपण आपलीच सुरक्षा करावी असे आवाहन गावातील नागरिकांना भागवत देवसरकर,माजी तंटामुक्ती अध्यक्ष परसराम पाटील देवसरकर सुनील देवसरकर, संतोष देवसरकर जयंतराव देवसरकर अविनाश देवसरकर ग्रामपंचायत सदस्य इंदुबाई कवडे परसराम कवडे संदीप कवडे सुभाष कवडे यांनी केले आहे.
