रेमेडिसिव्हर च्या एका इंजेक्शन ची किंमत 27 हजार,नागपुरात मोठा काळाबाजार

जिल्हा प्रतिनिधी:शाहिद शेख,नागपूर

कोरोनाच्या काळात खाजगी रुग्णालयात बिलाच्या नावावरून लूटमार सुरू असल्याचे अनेक प्रकरण समोर आले आहेत .अश्याच कोरोनाच्या उपचारासाठी महत्त्वाच मानलं जाणार इंजेक्शन म्हणून रेमडिसिव्हर चा देखील काळाबाजार सुरू झाला आहे.अश्यातच नागपुरातील एका खाजगी रुग्णालयातील स्टाफ असलेल्या एका व्यक्ती ला इंजेक्शन मिळेल का मागितल्यास 27000 हजार रुपये असेल तरच मिळेल तसेच कमीत कमी 26000 रुपयात देणार असे मान्य केले .त्या इसमाने बोलताना सांगितले की रुग्णालयात कामाला असलेल्या एका स्टाफ च्या घरच्या फ्रीज मध्ये ठेवले असल्याचे कळाले.