उपविभागिय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने देशी विदेशी दारुसह १ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल केला जप्त: दोन आरोपी अटकेत

  • शेडगाव चौरस्त्यावरील कारवाई

प्रतिनिधी:प्रमोद जुमडे

वर्धा जिल्ह्यामध्ये आठ ते तेरा तारखेपर्यंत कडकडीत बंद चे आदेश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले असून कोरोणा महामारी चा प्रकोप थांबता थांबत नसून अवैध धंद्यांना मात्र उत आल्याचे दिसून येत आहे. वर्धा जिल्ह्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सात वरील शेडगाव चौरस्त्यावर समुद्रपुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत हिंगणघाट येथील उपविभागीय पोलिस अधिकारी दिनेशजी कदम यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शन आज रविवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास नाकाबंदी करून नागपूर कडुन भरधाव वेगाने येत असलेल्या कार क्रमांक एम एच ३० पि ५२८ ची पाहणी केली असता या कार मध्ये देशी विदेशी दारुचा जखीरा आढळून आला यावेळी स्वता उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेशजी कदम यांच्या उपस्थितीत पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपये किंमतीचा दारूसाठ्यासह ५० हजार रुपये किंमतीची कार असा एकूण १ लाख ८० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी कुणाल पर्बत काळे वय वर्षे २४ व रूषभ सुशिल काळे वय वर्ष २३ दोन्ही राहणार हिंगणघाट यांना अटक केली.कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे जिल्हा कडक लॉकडाऊनमुळे पोलिस बंदोबस्तात व्यस्त असल्याची संधी साधून दारू विक्रेत्यांकडून संधींचे सोने करण्याचे काम सुरू असले तरी देखील पोलिसांनी कोरोना बंदोबस्तातून वेळ काळून या अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांचा डाव हाणून पाडला आहे.हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनात स्वता उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेशजी कदम पोलिस कर्मचारी चेतन पिसे,चंद्रशेखर बटरो. अश्विन सुखदेवे, सतिश घवघवे,प्रेमदेव चराटे यांनी केले आहे.