उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दिनेश कदम यांची दारू व्यावसायिकावर झेप. वाहना सहित केला 15 लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त

समुद्रपूर तालुक्यात वाढत्या दारूची विक्री वाहतूक रोखण्याच्या उद्देशाने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय हिंगणघाट येथे मोहीम आखण्यात आली होती. दिनांक 10/05/21 रोजी विश्वासनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे माननीय पोलीस अधीक्षका श्री. प्रशांत होळकर,अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा श्री.यशवंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे नागपूर ते चंद्रपूर मौजा धगडबन पाटी या ठिकाणी उपविभागीय कार्यालय हिंगणघाट येथील पथकाने सापळा रचून पान क्रमांक M.H.26 A.K 9707 मोठ्या शिताफीने अडविले त्यावेळेस कार चालकाने पळून जाण्याच्या प्रयत्न केला असता त्यास प्रसंगवधान दाखवून मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर पंचांसमक्ष सदर वाहनाची झडती घेतली असता सदर वाहनात देशी दारू ने भरलेल्या 90 ml च्या 100 खर्ड्याच्या खोक्यात एकूण 10,000 शिश्या किं.15,00,000 रूपये व वाहन क्रमांक MH 26 AK 9707 किंमत 10,00,000 रुपये असा एकूण 15,00,000 रुपयाचा माल हस्तगत केला. उपरोक्त कार चालक पियुष माणिक माणूसमारे वय 32 रा.आझाद वार्ड वरोरा व हस्तगत मोटार वाहन व नमूद मुद्देमाल पोलीस स्टेशन समुद्रपूर ठाण्यात आणून त्यांच्यावर दारूबंदी कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली सदर कार्यवाही उपविभागीय पोलिस अधिकारी श्री दिनेशजी कदम हिंगणघाट, पोलीस उपनिरीक्षक हरणखेडे ,श्री रामटेके, पोलीस हवालदार शेखर भटेरो ब.नं 826 पो. ना. चेतन पिसे ब. नं. 1250, सतीश घवघवे ब. न. 1270,अश्विन सुखदेवे ब.न. 55 ,पोलीस शिपाई प्रेम देव सराटे 572 ,सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय हिंगणघाट यांचेसह कार्यवाही करण्यात आली.