देगलूर-बिलोली विधानसभा पोट निवडणूकित पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल-खा.प्रतापराव पाटील चिखलीकर

हिमायतनगर प्रतिनिधी:परमेश्वर सुर्यवंशी

आमदार रावसाहेब अंतापूरकर यांच्या दुर्दैवी निधनामुळे रिक्त झालेल्या देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणूकीत पंढरपूरच्या निकालाची पुनरावृत्ती होईल असा विश्वास खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी देगलूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलतांना व्यक्त केला. यावेळी जिल्ह्याध्यक्ष व्यकंटराव पाटील गोजेगावकर यांच्यासह पदाधिकाऱ्याची उपस्थिती होती.
हानेगाव येथील आबासाहेब देशमुख व मंडगी येथील जि.प.चे माजी अध्यक्ष संभाजीराव मंडगीकर यांचे निधन झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी खासदार चिखलीकर हे देगलूर येथे आले होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना खा.चिखलीकर म्हणाले की, या पोटनिवडणूकीसाठी भाजपा सज्ज आहे, यासाठी कोर कमिटीचे सदस्य गोजेगावकर हे आहेत. कोर कमिटी जो निर्णय घेईल तो उमेदवार राहील.पक्षाने जो उमेदवार दिला त्याला सर्व ताकदीने निवडून आणू आणि या मतदारसंघात पंढरपूरची पुनरावृत्ती होईल असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आतापर्यंत 9 जणांनी भाजप पक्षाकडे उमेदवारी मागणी केली आहे
देगलूर शहरात भाजपच्या वतीने कोविड सेंटर लवकरच सुरू करू असे आश्वासन खा. चिखलीकर यांनी दिले