वार्ड क्रमांक 12 ची शिवसेनेचे उमेदवार नागेश शिंदे यांच्या मातोश्री ना देण्यात यावी :- जनतेची मागणी निष्ठावंतांना न्याय द्या


👉🏻

हिमायतनगर प्रतिनिधी

नगर पंचायत सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम दिनांक 27 नोव्हेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर शहरात निवडणुकीचे वारे चांगलेच वाहू लागले आहेत पण महाराष्ट्रात महा विकास आघाडीची सत्ता आहे त्या पार्श्वभूमीवर हिमायतनगर नगरपंचायत वर पण महाविकासआघाडी ची सत्ता येईल की काय याकडे मात्र सर्व जनतेचे लक्ष लागले आहे त्यामुळे मागील पंचवीस वर्षापासून वार्ड क्रमांक 12 हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्यामुळे येथे यावेळेस आरक्षण सोडतीत ही जागा ओबीसी महिलेसाठी राखीव ठेवण्यात आली त्यामुळे त्याच वॉर्डातील सक्षम व पक्षाचे काम करणारी निष्ठावंत शिवसैनिक समाज संघटनेचे कौशल्य असणारे सुशिक्षित नागेश परमेश्वर शिंदे यांच्या आई ही उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सध्या सोशल मीडिया सह शहरात जोर धरत आहे

नगरपंचायत आरक्षण सोडत झाल्यानंतर वार्ड क्रं.12 मध्ये अनेक नवखे चेहरे तिकीट मागण्यासाठी समोर येत आहेत त्यामुळे ह्या वार्डातील निष्ठावंत व समाजकार्यात सदैव अग्रेसर असणारे नवतरुणांशी चांगला जनसंपर्क असणारे, लॉक डाऊन मध्ये वार्डा सह अनेक गोरगरीब नागरिकांना अन्नधान्याच्या राशन कीट वाटप करणारे ,गल्लीतील अडीअडचणी वेळोवेळी सोडणारे कडवट युवा कार्यकर्ते नागेश परमेश्वर शिंदे यांच्या आईस सौ.वंदना परमेश्वर शिंदे यांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी सध्या जोर धरत आहे

त्यामुळे हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंत भाऊ पाटील, हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे लोकप्रिय माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर व लोकनेते गंगाधर पाटील चाभरेकर हे ह्या वार्डाची उमेदवारी कुणाला देतील या निर्णयाकडे हिमायतनगर शहरातील जनतेचे लक्ष लागले आहे