जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या समोर नागरीकांच्या रांगा ,या गर्दी ला जबाबदार कोण?

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी,हिमायतनगर

हिमायतनगर तालुक्यात एकमेव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक असुन त्या ठिकाणी नागरीकानी आपले पैसे उचलण्यासाठी मोठी गर्दी केलेली दिसुन येत आहे याला जबाबदार कोण? अशा प्रश्न उपस्थित केला जात आहे गेल्या काही महिन्यांपासून नागरिकांना मोदींच्या पैसाची ओढ होती पैसे जमा होताच नागरीकानी कोरोणा संसर्गजन्य रोगांची भिंती न बाळगता रांगेत उभे राहून मोठी गर्दी त्यामुळे उदयाला निर्माण होणाऱ्या परिस्थितीला तोंड कोण देणार यांवर नियंत्रण कोण ठेवणार जिल्हा मध्ये संचार बंदी असताना देखील येवढी गर्दी जमली कशी या कडे बँक कर्मचारी यांची जबाबदारी नाही का असा प्रश्न उपस्थित होतो आज संपूर्ण महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोणा रुग्न संख्या वाढत आहे तरी देखील प्रशासनाने ढिल सोडलेली दिसुन यावर पाबंदी नाही घातल्यास तालुक्यातील रुग्न संख्या वाढत जाईल याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे जर का बँक एक तास अगोदर उघडल्यास नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही वेळेवर पैसे विना दलाली चे दिले तर नागरीकाची पिळवणूक सुध्दा थांबेल दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांना बँक ही आँनलाईन केली त्यांना एटीएम सुविधा उपलब्ध करून दिल्यास बँक मध्ये होणाऱ्या गर्दीला आळा बसेल त्यामुळे नागरिकांना तात्काळ एटीएम सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे अशी देखील शेतकरी लोकान मध्ये चर्चा होताना दिसत आहे त्यामुळे जिल्हा अधिकारी व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष यांनी यांवर नियंत्रण ठेवले पाहिजे व नागरीकांना योग्य सेवा दिली पाहिजे असे यावेळी पत्रकारांशी बोलताना काही शेतकऱ्यांनी सांगितले आहे.