दिनांक.९/१२/२०२०रोज कोहळी येथे बांबू लागवड प्रकीयेसाठी पाशा पटेल यांचे मार्गदर्शन


प्रतिनिधी… परमेश्वर सुर्यवंशी


हादगाव तालुक्यातील मौजे कोहळी येथे लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांच्या नेतृत्वाखाली भव्य असे बाबु लागवडीसाठी हिताचे कार्य हाती घेतले जात आहे तरी सर्व
शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, शेतकरी नेेते बाबुराव कदम कोहळीकर यांचे आवाहन
शेतकऱ्यांना शेती मध्ये फायदेशीर ठरत असलेल्या बांबू या गवत वर्गिय पिकाची माहिती व्हावी यासाठी महाराष्ट्र राज्य कृषी मुल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पर्यावरण अभ्यासक तथा माजी आमदार पाशा पटेल यांच्या उपस्थितीत दि ९ मंगळवारी सायंकाळी सहा वाजता कोहळी ता. हदगांव येथे मार्गदर्शन पर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून हदगाव हिमायतनगर तालुक्यासह निवघाबाजार परीसरातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या कार्यशाळेली उपस्थित राहुन फायदेशीर ठरणारी बांबु लागवड समजुन घ्यावी असे आयोजक शिवसेनचे माजी जिल्हा प्रमुख प्रतिआमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी केले आहे