
प्रतिनिधी:गुरुदास धारने, चिमूर
लोकहीत महाराष्ट्र चिमूर ग्रुप ला जॉईन करा आणि मिळवा प्रत्येक बातमी
https://chat.whatsapp.com/IKn51mZMcJnEsm0h22grHT
चिमूर तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेले कोकेवाडा (पेंढरी) येथील सीताबाई गुलाब चौखे वय 55 ही महिला समवेत दिवाण तलाव परिसरात तेंदू पता संकलनासाठी गेली असता वाघाने तिच्यावर हल्ला केला व ती जागीच ठार झाली. सध्या तेंदू पत्त्याचा हंगाम सुरू असल्याने अनेक परिसरात महिला व पुरुष जंगलात जाऊन तेंदूपत्ता संकलनासाठी जात आहेत आणि त्यात वन्यजीवाकडून हल्ला झाल्याच्या अनेक घटना घडतांना दिसून येत आहे.यावर सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे कोरोना काळात एकतर रोजगार नाही त्यातल्या त्यात रोजगार आलाय आणि वाघाची दहशत सुद्धा . नेमके जगण्यासाठी करायचं तरी काय हा प्रश्नच सर्वसामान्य नागरिकांच्या पुढे आहे .मानव व वन्यजीव यात संघर्ष वाढतच आहे.जंगलशेजारील असलेल्या गावांसाठी या घटना नित्याचाच झाल्या आहेत.अश्या हल्ल्यात कित्येक नागरिकांचा मृत्यू आजवरी झालेला आहे.
