स्टुडंट फोरम ग्रुप आणि ग्राम आरोग्य फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोडशी (खु) येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर आणि औषधांचे वितरण

कोरपना-
येथील स्टुडंट फोरम ग्रुप आणि ग्राम आरोग्य फाऊंडेशन चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कोडशी (खु) येथे निःशुल्क आरोग्य तपासणी शिबीर आणि औषधांचे वितरण करण्यात आले.मागील सात वर्षांपासून स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तालुक्यातील तरुणांचे अग्रणी संघटन आहे. शैक्षणिक प्रगतीचा ध्यास डोळ्यासमोर ठेवून स्थापन झाला . पण तालुका मागास असल्यामुळे ग्रुपच्या वाटचालीत अडचणी निर्माण होत होत्या. त्या अडचणीच्या मुळाशी जाण्याच्या उद्देशाने ग्रुपने पाऊले उचलण्यास सुरुवात केली. त्या वाटचालीत सामाजिक दायित्वाचे कार्य हाती घेऊन शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक मागासलेपणा दूर करण्याच्या हेतूने ग्रुप मागील सात वर्षांपासून कार्य करीत आहे.
स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना या ग्रुपची शाखा कोडशी खु येथे ग्राम आरोग्य फाउंडेशन याच्या संयुक्त विद्यमाने कोरपना तालुका कोरोना मुक्त करणे हा ध्यास डोळ्यासमोर ठेवून ग्राम आरोग्य सेनेचे संस्थापक डॉ. प्रवीण येरमे सर याच्या सहकार्याने निःशुल्क आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ११० पेक्षा अधिक रुग्णाची तपासणी करून त्यांना मोफत औषधी देण्यात आली. याचप्रमाणे ग्राम आरोग्य फाउंडेशनच्या माध्यमातून कोरपना परिसरातील वडगाव तसेच इतर ठिकाणी शिबिर घेत १००० पेक्षा अधिक रुग्णांना तपासून बहुसंख्य रुग्णांना मोफत औषधे पुरविण्यात आली.
आज अशा बिकट परिस्थिती सर्व सामान्य जनता भयभीत झाली आहे. रुग्णालयात जाण्यास घाबरत आहे. व्हायरस तापाचे लक्षणे आपल्या शरीरात दिसून येत आहे. पण आजच्या परिस्थिती रुग्णालयात जाण्याची मानसिकता मानवाच्या अंगात नाही. हेच निरखून स्टुडंट फोरम ग्रुपच्या संघटकानी पुढाकार घेतला, मदतीला ग्राम आरोग्य सेनेचे रुग्णसेवक श्री. दिनेश राठोड, श्री. संजय सोयाम, श्री. कुमरे मेजर,श्री. नागो मेश्राम, श्री.रवी मडावी, श्री. संतोष मडावी, श्री.लक्ष्मन कोरांगे धावून आले.
कोरपना येथे डॉ. येरमे सर कोरोना रुग्णांवर निःशुल्क उपचार करत आहेत. रुग्णांनी बरे झाल्यानंतर जातीभेद सोडून समाज सेवा करावी हिच माझी तपासणी फी , असे म्हणून डॉ. येरमे सर समाजाची सेवा करत आहे. असे उपक्रम यशस्वी होण्यात समाजाची बांधिलकी जपणाऱ्या अदृश्य हातांचा तितकाच वाटा आहे. त्याचेही ऋण मदतीच्या ओघातून दिसून येते.
हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी श्री.सुशील कुमार नायक सर(SDPO Nandafata), श्री आबिद जी अली,श्री. किशोर भाऊ बावणे श्री.अनिल रेगुंडवार, श्री.अरुण डोहे , श्री. राजुभाऊ बुऱ्हान, श्री. घनश्याम पाचभाई सर,अँड श्रीनिवास मुसळे, श्री. दिवाकर धोटे,श्री.विजय पानघाटे, श्री. नदीम सय्यद, श्री.तुषार देरकर, श्री.दिनेश ढेंगळे, श्री.अंशुल पोतनुलवार ,अशोक जरिले, प्रफुल भोयर या सर्वांनी सहकार्य व प्रेरणा दिल्याने हे शक्य होऊ शकले. तसेच कोडशी खु तेथे झालेल्या आरोग्य शिबिरात ग्रुपच्या संघटकाचा मोलाचा हातभार लागला आहे. त्यात कोडशी खु शाखा ग्रुपचे संघटक व सर्व मित्र परिवार संतोष मडावी, पंडित नाकले, मोहन वडे, कपिल मने, अनुज गेडाम, प्रफुल पिदुरकर, मधुकर इटकलवार, सचिन जरिले, नितिन जगनाडे, अंकित दुरवटकर, विशाल गेडाम यांचा आरोग्य शिबिर यशस्वी करण्यात खारीचा वाटा होता. स्टुडंट फोरम ग्रुप कोरपना तर्फे या पुढे ही कोरोना लढ्यात खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार अशी भावना ग्रुपच्या संघटकानी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली.