हिमायतनगरात महसूलच्या पथकाची धडाकेबाज कार्यवाही; फक्त २ ट्रैक्टर पोलीस ठाण्यात लावले

प्रतिनिधी: परमेश्वर सुर्यवंशी

हिमायतनगर| विदर्भ – मराठवाड्याच्या मध्यभागातून वाहणाऱ्या पैंगणग नदीकाठावरून वाहणाऱ्या कामारी, विरसनी, दिघी, कोठा, कोठा तांडा, वारंगटाकळी, धानोरा, बोरगाडी तांडा, एकंबा, पळसपूर आदी ठिकाणाहून रेतीची रात्रंदिवस चोरी केली जात आहे. याबाबतचे वृत्त मागील १५ दिवसापासून प्रकाशित होत असल्याने अखेर याची जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी दाखल घेऊन कार्यवाहीचे आदेश देताच दि.२८ च्या रामप्रहरी महसूलच्या पथकाने रेती भरून वाहतूक करणारे फक्त २ ट्रैक्टर पकडून पोलीस ठाण्यात लावले आहेत. या कार्यवाहीमुळे रेती, मुरूम, दगडसारख्या गौण खनिजाची चोरी करू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
पैनगंगा नदीकाठावर असलेलता रेती धक्क्यावरून अनधिकृतपणे उत्खनन करून राजकीय वरदहस्त
जर जिल्हा प्रशासनाला खरोखरच शासनाच्या महसूलमध्ये वाढ करावयाची असेल तर हिमायतनगर – उमरखेड पैनगंगा नदीकाठावरील प्रत्येक गावात आणि रान शिवारात कोणालाही न सांगता अचानकपणे ड्रोन कैमेऱ्याद्वारे चित्रीकरण केल्यास कुठे किती ब्रास रेतीचा साठा करण्यात आला हे दिसून येईल. त्यातही काही कळले नाहीतर हिमायतनगर तालुक्यात ज्या जय ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले त्या कैमेऱ्याचे मागील ६ महिन्यातील डेटा चेक करून विनापरवाना रेती भरून वाहतूक करणारे, ट्रैक्टर, टिप्पर, निदर्शनास येतील. यावरून तरी निधन पत्रकारांनी लिहिलेल्या बातम्या सत्य कि असत्य हे कळेल. तसेच पैनगंगा नदीला राजकीय वरद हस्ते असलेल्या या रेती माफियांनी कश्या प्रखर पोखरून काढले हे दिसून येईल. रेती माफियांच्या माजलेल्या धुमाकुळामुळे पैनगंगा नदीतील पाणी पातळी खोलवर गेली असून, यावर अवलंबून असलेल्या अनेक गावच्या नळयोजना मागील ४ महिण्यापासून बंद पडल्याने नागरिकांना पशु पक्षी व प्राण्यांना थेंबभर पाण्यासाठी भटकंती करावी लागते आहे. यास फक्त आणि फक्त रेतीचे अवैद्य उत्खनन जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया रेती उत्खननास विरोध असलेल्या अनेक गावच्या सरपंच बांधवांतून केला जातो
दरम्यान नेहमी प्रकाशित होणाऱ्या वृत्ताची दाखल घेऊन जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी जिल्ह्यातील नदीपात्रालगतच्‍या शेतजमिनीत किंवा इतर ठिकाणच्‍या शेतीजमिनी तसेच महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामीण भागात बांधकामाच्‍या ठिकाणी अवैध रेतीसाठे कुणाला आढळल्यास अशा शेतकऱ्यांनी किंवा खाजगी जमीन मालकांनी त्‍यांच्या जमिनीत केलेल्‍या अवैध रेतीसाठयाची माहिती संबंधीत कार्यक्षेत्रातील तलाठी, मंडळ अधिकारी, तहसिलदार व उपविभागीय अधिकारी यांना तात्‍काळ कळवावी, जिल्ह्यातील जप्‍त रेतीसाठ्याच्‍या लिलावाच्‍या अनुषंगाने करावयाची कार्यपध्‍दती निश्‍चीत करण्‍यात आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत लिलाव झालेला नसून कोणी जर नदीपात्रालगतच्‍या शेतीमध्‍ये मोठया प्रमाणात अवैध रेतीसाठे करीत असतील तर त्यांच्या कठोर कारवाई करू असे निर्देश दिले आहेत.
यावरून हदगावचे उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली शुक्रवारी सकाळी त्यांच्या विशेष पथकाने हिमायतनगर तालुक्यात फक्त दोन रेतीचे भरलेले ट्रॅक्टर पकडून धडक कारवाई केली. ते ट्रेक्टर हिमायतनगर पोलीस स्टेशन मध्ये लावले असून, या वाहनधारकांनी शासनाच्या नियमाप्रमाणे १ लक्ष १३ हजारच प्रत्येकी दंड भरला नाहीतर त्यांच्यावर फौजदारी कार्यवाही होणार आहे. एकूणच या कार्यवाहीमुळे हिमायतनगर शहरातील व ग्रामीण भागातील रेती माफियांचे धाबे दणाणले असले तरी अजूनही अनेक ठिकाणी चोरीच्या मार्गाने रेतीची वाहतूक करून गरजूना अव्वाच्या सव्वा दराने विक्री केली जात असल्याचे आणि करण्यात आलेल्या साठेबाजीचे चित्र सध्या तालुक्यात दिसून येत आहे. यानंतर महसूल प्रशासन नदीकाठावरील रान-शिवारात आणि गावखारी करण्यात आलेल्या रेतीसाठ्यावर कशी कार्यवाही करणार हे पाहावे लागणार आहे.
जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाची हिमायतनगरात अंमलबजावणी होईल का..?
सर्व ठिकाणच्या बांधकामाच्‍या ठिकाणी वापरण्‍यात येत असलेल्‍या रेतीबाबत संबंधीत तहसिलदार यांचेमार्फत नायब तहसिलदार व मंडळ अधिकारी यांची पथक गठीत करुन तपासणी करण्‍यात येईल. ज्‍या शेतकऱ्यांनी किंवा खाजगी जमीनधारकांनी अशा प्रकारचे अवैध रेतीसाठे असल्‍याची माहिती जिल्‍हा प्रशासनास कळविणार नाहीत. अशा शेतकरी, खाजगी जमीन मालकाविरुध्‍द महाराष्‍ट्र जमीन महसुल अधिनियम, 1966 मधील कलम 48 मधील पोट कलम (7) नुसार दंडात्‍मक कार्यवाही करण्‍यात येईल. या दंडात्‍मक रक्‍कमेचा बोझा संबंधीताच्‍या जमिनीवर घेण्‍यात येईल याची संबंधीतानी नोंद घ्‍यावी, असेही जिल्हाधिकारी डॉ.विपीन यांनी कळविले आहे. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या आदेशाची हिमायतनगर तालुक्यात महसुलाचे अधिकारी कितपत अंमलबजावणी करतील हे आता पाहावे लागणार आहे.