केंद्रीयमंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त ऑटो चालक व वाजंत्री व्यावसायिकांना किराणा किट चे वाटप

प्रतिनिधी:राहुल कोयचाडे,चिमूर

नेरी
केंद्रीयमंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या माध्यमातून नेरी येथील ऑटो चालक व मातंग समाजातील बँड वाजंत्री व्यवसाय करणाऱ्याना जीवनाशयक वस्तू किट चे वाटप भाजप तालुका अध्यक्ष राजु पाटील झाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले .

कोरोना च्या दुसऱ्या लाटेतील लॉकडाऊन मुळे ऑटो चालक , मातंग समाजातील बॅड व्यवसायिक यांचे व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची पाळी येऊ नये त्यांच्या आर्थिक संकटात मदत करावी या हेतूने आमदार बंटीभाऊ भांगडिया यांच्या माध्यमातून नेरी येथील ऑटो चालक,बॅड व्यावसायिक यांना जीवनाशयक वस्तू किट चे वाटप करण्यात आले.

यावेळी ग्राम पंचायत सदस्य तथा भाजप क्षेत्र प्रमुख संदीप पिसे ,ग्राम पंचायत सदस्य पिंटू खाटीक ,भाजप महिला तालुका अध्यक्ष मायाताई ननावरे, दत्तूजी पिसे, नरेंद्र पंधरे रमेशजी कंचर्लावार आदी उपस्थित होते…