बागलाण येथे महावितरणचा नागरिकांच्या जिवाशी खेळ,50 ते 60 घरांमध्ये विजेचा करंट,गावकरी संतप्त

नाशिक जिल्हा/ सविस्तर वृत्त असे की दिनांक 28 मे रोजी सायंकाळी बेमोसमी पावसाने हजेरी लावली असता बागलान तालुका येथील मोरे नगर येथे ग्रामस्थांच्या समय सूचकतेने मोठी दुर्घटना टळली झाले असे की सायंकाळी पावसाने सुरुवात झाली असता मोरेनगर फाट्याजवळ सब स्टेशन लागून असलेली आदिवासी वस्ती आहे त्यातच पावसामुळे कमीत कमी 50 ते 60 घरांमध्ये विजेचे करंट उतरले असता काही मुलांना शॉक बसून जखमी झाले असून तर् काही घरांमधील संपूर्ण वस्तू जळून खाक झाल्यात, सदर ग्रामपंचायत ने वारंवार निवेदन देऊनही संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची दखल न घेतल्यामुळे आज ही मोठी दुर्घटना घडली असती तर याला जबाबदार कोण असा प्रश्न मोरेनगर वासीय विचारत असून संबंधित अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर आदिवासी वस्तीवरील जीर्ण झालेल्या तारांची दखल घेतली नाही तर लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या अधिकारांना उग्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला. यावेळी मोरे नगर चे सरपंच सुरेश जाधव, माजी सरपंच बाळासाहेब देवरे, उपसरपंच भरत अहिरे, सदस्य सुरेश अहिरे, दौलत पवार, सुभाष काका सोनवणे, बापू जाधव, अजित खैरनार ,नरेंद्र मोरे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते