
राजूरा तालुक्या अंतर्गत येत असलेल्या निर्ली ते पेलाेरा या शिव पांदन रस्त्यावरील अतिक्रमण धारक शेतक-यांचे अतिक्रमण हटवून ताे रस्ता काल मंगळवार दि.१५जूनला माेकळा करुन देण्यांत आला . भर पावसाळ्याच्या दिवसात धिडसीचे तलाठी विनोद खाेब्रागडे यांनी सदर कारवाई केली .दरम्यान निर्ली ते पेलाेरा या सरकारी पांदन रस्त्यावर काही शेतक-यांनी अतिक्रमण केले हाेते .या अतिक्रमणचा त्रास व अडचण या परिसरातील अन्य कास्तकरांना हाेत हाेता .शेवटी सुरेन्द्र आमने यांनी राजु-याचे तहसीलदार यांचे लेखी तक्रार करुन ही अतिक्रमण बाब निदर्शनास आणुन दिली .शेतकरी वर्गांची अडचण बघता तातडीने राजूरा तहसीलदार यांनी धिडसीचे तलाठी विनोद खाेब्रागडे यांना एका पत्राचे अनुषंगाने वरील बाब कळविली .त्या नंतर तलाठी यांनी काल प्रत्यक्ष माैक्का स्थळी जावून रस्त्यावरील अतिक्रमण हटवून रस्ता माेकळा करून दिला असल्याचे खुद्द तलाठी खाेब्रागडे यांनी माध्यमांशी शी बाेलतांना आज सकाळी सांगितले .रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्याच्या पुर्वि अतिक्रमण धारकांना अतिक्रमण काढण्यांची सुचना तलाठी यांनी केली हाेती परंतु पांदन रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यांस ते तयार नव्हते शेवटी तलाठी विनाेद खाेब्रागडे यांनी स्वताच पुढाकार घेवून अतिक्रमण हटविले व आपले कर्तव्य पार पाडले या वेळी त्यांचे साेबत निर्लीचे पाेलिस पाटील , पेलाेराचे पाेलिस पाटील काेतवाल व काही शेतकरी हजर हाेते .पांदण रस्त्यावरील अतिक्रमण हटविल्या नंतर तसा अहवाल तलाठी विनाेद खाेब्रागडे यांनी राजूराचे तहसीलदार यांना सादर केला या नंतर परत अतिक्रमण हटविलेल्या रस्त्यावर अतिक्रमण केल्यास फाैजदारी कारवाई करण्यांची सूचना विनोद खाेब्रागडे यांनी माैक्का स्थळी केल्यामुळे त्या पांदन रस्त्यावर परत अतिक्रमण हाेणार नाही असे एकंदरीत वाटते .पांदन रस्त्यावरील अतिक्रमण हटवून ते रस्ते माेकळे करण्यांची माेहिम प्रामुख्याने महसुल विभागाच्या राजस्व अभियानात दरवर्षि हाती घेतल्या जाते हे येथे उल्लेखनिय आहे .खाेब्रागडे यांनी केलेल्या या धडक कार्यवाहीचे या परिसरातील शेतकरी व नागरिकांनी स्वागत केले आहे .
