ग्रामपंचायत कुंन्ड्रा येथे कोरोना लसीकरण शिबीर संपन्न

प्रतिनिधी:शेखर पिंपळशेंडे

ग्रामपंचायत कुंन्ड्रा येथे कोरोना लसीकरण शिबीर घेण्यात आले शिबिराचे उदघाटन मा. आ श्री संजीव रेड्डी बोदकुरवार साहेब यांच्या हस्ते करण्यात आले व प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्या मंगलाताई पावडे,भाजपा वणी तालुका अध्यक्ष गजाननभाऊ विधाते, माजी पं.स सभापती सुधाकर भाऊ गोरे,व प्रमुख उपस्थिती सरपंच विजय ठावरी,भाजयुमो तालुका अध्यक्ष शुभम गोरे सर्व ग्रामपंचायत सदस्य तलाठी,सचिव आरोग्य कर्मचारी ,मुख्याध्यापक व गावातील नागरिक उपस्थित होते.गावातील सर्व नागरिकांना लसीकरण मोहिमेचा लाभ घेण्याचे आवाहन ग्राम पंचायत प्रशासनाकडून केले आहे.