
प्रतिनिधी:तेजस सोनार,नाशिक
लोकहीत महाराष्ट्र नाशिक ग्रुप ला जॉईन करा
https://chat.whatsapp.com/LY8Gdhff1LyCgc4gEuBfuA
नाशिक आम आदमी पार्टी मध्ये येत्या महानगर पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही बदल करण्यात आले आहेत. नाशिक मध्ये ऑपरेशन हॉस्पिटल च्या यशस्वी प्रयोजनां नंतर संपूर्ण महाराष्ट्रात एक सकारात्मक वातावरण तयार झाले आहे आणि म्हणूनच शहरात पक्ष स्थापनेपासून काम करत असलेले जगबिर सिंग यांना सचिवपदी नेमणूक करून एक सार्थ निवड केल्याची भावना पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आम आदमी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे तसेच शहराध्यक्ष गिरीश उगले पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. सदरप्रसंगी शहर संघटनमंत्री विनायक येवले, संजय कातकाड़े, एकनाथ सावळे, तेजस सोनार, सोमा कुऱ्हाडे , चंद्रशेखर महानुभाव, राजेंद्र गायधनी उपस्थित होते. येत्या काळात पक्ष अधिक मजबुत होईल आणि नाशिक मध्ये 100 जागा निवडून येईल अशी आशा जगबिर सिंग यांनी व्यक्त केली.
