
प्रतिनिधी परमेश्वर सुर्यवंशी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे पळसपुर येथिल नागरीक पंतप्रधान आवास योजनेंतर्गत झालेल्या २०११ च्या सर्वे मध्ये खर्या लाभार्थ्यांना त्यांचा फायदा झालेला नसुन त्या मध्ये बोगस सर्वे करण्यात आला तरी याकडे कोणाचे ही लक्ष गेले नाही
तालुक्यातील प्र पत्रक ड यादी चा प्रश्न ग्रामविकास मंत्र्यांना बोलून मार्गी लावणार माधवराव पाटीलजवळगावकर
हिमायतनगर तालुक्यामध्ये ग्रामपंचायत अंतर्गत 2011साली झालेल्या प्रपत्र क्रमांक ड या यादीमध्ये गरजू लाभार्थी वंचित राहीले या बाबत त्यांना यादीमध्ये समाविष्ट करून प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी आज आमदार जवळगावकर यांच्या निवासस्थानी जवळगाव येथे पळसपुर घरकुल लाभार्थी यांचेसह कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती डॉक्टर प्रकाष वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली आमदार माधवराव पाटील जळगावकर त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांना एक पत्र सादर करून वरील विषयावर सखोल चौकशी मार्गदर्शन करत असताना आमदार साहेबांनी गेलेल्या शिष्टमंडळाला आश्वासन दिले की मी मुंबईला ग्राम विकास मंत्री यांना बोलून ग्रामसभा लावण्याच्या सूचना देऊन यादी गरजू लाभार्थ्यांना घर मिळाले पाहिजे याची यादी दाखल करण्याच्या सूचना देण्यासंदर्भात करून तुमचा प्रश्न मार्गी लावणार असे आश्वासन दिले असता यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नागोराव शिंदे सदाशिव वानखेडे विठ्ठल राव गायकवाड राजू कदम तुकाराम वानखेडे आदी उपस्थित होते
