शालेय व्यवस्थापन समितीची रचना करण्यासाठी बी इ ओ करतो टाळाटाळ

प्रतिनिधी …परमेश्वर सुर्यवंशी


हिमायतनगर तालुक्यात जवळपास सर्वच शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर ही त्यांची पुनरावृत्ती करण्यासाठी गटशिक्षणाधिकारी या कडे दुर्लक्ष करताना दिसुन येते त्यामुळे शाळेचा कारभार व तेथील व्यवस्था ही रामभरोसे झालेली आहे काही शालेय व्यवस्थापन समितीचा कार्यकाळ संपल्यानंतर एक वर्ष होऊनही अद्याप तेथील व्यवस्थापन समिती नियुक्त करण्यात आली नाही गेला वर्षांमध्ये महामारी चा प्रादुर्भाव लक्षात घेता कोणत्याही समित्या किंवा निवडणूक संदर्भात प्रशासनाने निर्णय घेण्यात आला नाही पण काही दिवसांनंतर प्रशासनाने आद्यादेश काडुन उर्वरित ग्रामपंचायत निवडणूक घेण्यात आला आहे त्याची रचना देखील करण्यात आली तरी गटशिक्षणाधिकारी अधिकारी यांनी त्यासंबंधी सर्व शिक्षक मुख्याध्यापक यांना आदेश दिलेले आहे असे आम्हच्या प्रतिनिधी यांच्याशी भ्रमणध्वनी द्वारे बोलताना सांगितले आहे तरी देखील काही मुख्याध्यापक यांनी धाब्यावर बसवून शालेय व्यवस्थापन समितीची रचना लावली की काय?असा प्रश्न उपस्थित होतो जर का वेळेवर शालेय व्यवस्थापन समिती ची रचना नाही लावण्यात आली तर मोदी स्पोर्टर संघ जिल्हा अध्यक्ष हे लोकशाही मार्गाने जावे लागेल अशा इशारा यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला आहे.