
-हिमायतनगर.प्रतिनिधी
आजच्या युगातील महिलांनी सर्वच क्षेत्रामध्ये आघाडी घेतली असल्याचे सद्या पहायला मिळते पुरुषांच्या बरोबरीने सरस पणे महिला सुद्धा काम करत आहेत त्याचेच एक ज्वलंत उदाहरण नांदेड शहरात कर्तव्यावर असलेल्या महिला ट्राफिक पोलिस कर्मचाऱ्यांचा जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी महिला दिनाचे औचित्य साधून 8 मार्च रोजी ट्राफिक पोलीस महिलांना सन्मानपत्र करून त्यांचा सत्कार केला व ज्यांनी आपल्या मुलाचा सांभाळ स्वतः करून त्यांना उच्च पदावर नेले अशा दहाच्या वर आदर्श माताचा सत्कार सुद्धा त्यांनी यावेळी केला
याप्रसंगी बोलताना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हा सचिव सौ.मिनाक्षी पाटील यांनी असे सांगितले की आजच्या आधुनिक काळामध्ये महिला या पुरुषांच्या बरोबरीने राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक, आरोग्य ,संरक्षण अशा इत्यादी क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत कुटुंबाच्या जडणघडणीमध्ये देखील महिलांचा मोठा वाटा असतो असे असतांना देखील आजही ग्रामीण भागामध्ये व शहरी भागांमध्ये स्त्रियांवर अनेक अत्याचार होत आहेत यासाठी महिना विषयी कायद्याची कठोर अंमलबजावणी होणे सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे आज नांदेड शहरांमध्ये कर्तव्यावर असलेल्या ट्राफिक पोलीस कर्मचारी महिलांचा आम्ही महिलादिनी सत्कार करून एक आदर्श आपल्यासमोर ठेवत आहोत व शहरातील दहा च्या वर अशा महिला ज्या महिलांनी स्वतःहा च्या मेहनतीचे आपल्या मुला-मुलींना शिकवले व त्यांना वाढवले त्यांना संस्कार दिले व त्यांना उच्च पदावर पाठवले अशा महिलांचा सुद्धा या वेळी आम्ही सन्मान पत्र देऊन सत्कार केला असे त्यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले
यावेळी जयश्रीताई भायेगावकर प्रदेश संघटक,डाॅ.विद्या पाटील जिल्हाध्यक्षा,अरूणा जाधव जिल्हाध्यक्षा,राणी दळवी उपाध्यक्षा,वनिता देवसरकर , सौ. मिनाक्षी पाटील जिजाऊ ब्रिगेड सचिव,रेणुका कौशल्ये कार्याध्यक्षा ,सुमित्रा वडजकर संघटीका ,किर्ती सुस्तरवार ,विजया पाटील यांच्या सह जिजाऊ ब्रिगेड च्या महिला कार्यकर्त्या यावेळी उपस्थित होत्या
