जीवावर उदार होऊनही शासनाचे दुर्लक्ष,परिचरिकांचा बेमुदत संपावर

कोरोना काळातील सेवेचा शासनाला विसर

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी

कठीन काळात परिचारिकांनी पूर्ण क्षमतेने रुग्णसेवा दिली. त्यानंतरही शासनाने परिचारिकांच्या विविध न्याय मागण्यांना केराची टोपली दाखवली, असा आरोप करीत  विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने बुधवारी पासून कामबंद आंदोलनाची घोषणा केली आहे.  मेडिकल- मेयोतील बऱ्याच परिचारिका संपावर राहणार असल्याने येथील रुग्णांचा जीव टांगणीला असल्याचे चित्र आहे. परंतु रुग्णालय प्रशासनाने आवश्यक उपाय केल्याने रुग्णसेवेवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा केला आहे.
आम्ही संप करून रुग्णांना वेठीस धरत नाही. मात्र आमच्या मागण्यांबाबत शासन गंभीर नाही. त्यामुळे  आंदोलन करावे लागत आहे. जुनी पेंशन योजना ,100%रिक्त असलेले पद भरती,समान काम समान वेतन ,परीचारिकांचा खासगीकरण,केंद्रप्रमाणे वेतन या सारख्या अनेक मागण्यांना घेऊन शासन दरबारी विनंती करून देखील शासन जुमानत नसेल तर बेमुदत काम बंद आंदोलन होणारच असे परिचरिकांकडून सांगण्यात येत आहे. मेडिकलमध्ये एक हजारावर परिचारिका तर मेयोतील परिचारिका संपात सहभागी झाल्या आहेत. दरम्यान, राज्यात सध्या ३० हजारावर परिचारिका आहेत. त्यांच्या नियोजनाची जबाबदारी एसएनएस यांच्याकडे असून हे पदच रिक्त आहे.  राज्यात परिचारिकांच्या दोन वेगवेगळ्या संघटना  आहेत. यावेळी एका संघटनेतर्फे बुधवारी आंदोलन पुकारण्यात आले आहे.  दुसऱ्या संघटनेने संपात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. यामुळे काही प्रमाणात रुग्णांना दिलासा मिळणार आहे. हा संप सकाळी ८ वाजतापासून   होणार असल्याचे आंदोलकांकडून सांगण्यात आले