५जुलै रोजी राज्यभरातील शिक्षक काळ्याफिती लावून काम करणार

निषेध आंदोलन मागण्यांची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद


मागील २० महिन्यांपासून शासनाकडे ३२ मागण्या केल्या आहेत. महाविकास आघाडी सरकारने मागण्यांची कोणतीही दखल घेतली नाही. त्यामुळे याविरुध्द ५ जुलै २०२१ रोजी काळ्या फिती लावून आंदोलन करत मागण्यांबाबत जिल्हा तालुका विभाग ,राज्य स्तरांवर शासनाला निवेदन देण्यात येणार आहे.
कोविडच्या पार्श्वभूमीवर शिक्षक परिषदेने तीव्र, उग्र आंदोलन टाळले असून शासनाने या मागण्यांची दखल न घेतल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचे शिक्षक परिषद कार्यकारिणी ने निर्णय घेतला आहे.
शिक्षक परिषदेचे नागपूर विभागाचे शिक्षक असणारे एकमेव आमदार नागो गाणार यांनी दि. १ जुलै ला शासनाला वेगवेगळ्या ३२ मागण्यांचे निवेदन दिले, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अध्यक्ष वेणूनाथ कडू कार्यवाह नरेंद्र वातकर यांनी 30 जून रोजी शासनाला कळवले असून शासनाचा निषेध म्हणून काळ्या फिती लावून आंदोलन करणार असल्याचे सांगितले आहे.
काही निवडक मागण्यांमध्ये, जुनी पेंशन योजना लागू करुन भविष्य निर्वाह निधी योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करणे, १०, २०, ३० ही आश्वासित प्रगती योजना शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांना लागू करणे, ७ व्या वेतन आयोगाच्या थकबाकीचा पहिला व दुसरा हफ्ता तात्काळ देण्यात यावा, शिक्षकेत्तरांची पदे भरतीबाबतचा निर्णय रद्द करुन पूर्वीप्रमाणे भरती करण्यात यावी, कोरोनाग्रस्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना विशेष रजा मंजूर करणे, कोरोनामुळे मृत कर्मचार्‍यांच्या वारसदारांना अनुकंपा योजना लागू करावी. अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची मुक्तता करणे, कॅशलेस आरोग्य विमा योजना लागू करणे, डी. सी. पी. एस. धारकांना पावत्या देण्यात याव्यात, क्रीडा विभाग अनुदानातील भ्रष्टाचार बंद करण्यात यावा, संस्था अंतर्गत वाद असणारी पदोन्नतीबाबत निर्णय घेण्याचे अधिकार मा. शिक्षणाधिकारी यांना देणे, आभासी पद्धतीच्या शिक्षण प्रणालीमध्ये एकसुत्रता यावी, वरिष्ठ व निवड श्रेणी ची प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत, अशा 32 प्रलंबित मागण्या शासनाने तात्काळ मान्य कराव्या. असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष शिक्षक आमदार नागो गाणार, राज्य अध्यक्ष वेणुनाथ कडू, सरकार्यवाह नरेंद्र वातकर, कोषाध्यक्ष किरण भावठाणकर, राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी,विभाग कार्यवाह योगेश बन,के.के बाजपेयी, सुनील पाटील, नरेश कामडे ,रंजना कावळे, हेमंत बेलखोडे, विनोद पांढरे, अजय वानखेडे, सुधीर अनवानने,राजेंद्र पटले, सुभाष गोतमारे,सुधीर वारकर, मनीषा कोलारकर, अशोक हजारे,प्रवीण भोयर,सुरेश रोठे,अंगेश बेहलपाडे,पुंडलिक नाकाडे, छत्रपाल बिसेन, गुनेश्वर फुंडे, मधुकर मुप्पीडवार,रामदास गिरटकर,संतोष सुरावर, गोपाल मुनघाटे, दिवाकर पुद्दटवार, सरिता सोनकुसरे,विकास नंदुरकर,सतीश कसरे, अतुल टेकाडे, मेघराज फुलके, जुगलकिशोर बोरकर, प्रकाश चुनारकर,अमोल देठे,दिलीप खंडाळे,मोरेश्वर गौरकर,वसंत केशरवानी, विशाल साटोने, सोपान घुले, रत्नाकर कावळे, वृंदा कथले,पुरुषोत्तम चौधरी, विजय साळवे,अविनाश तारापल्लीवार,प्रमोद खांडेकर, विलास बोबडे मोहन जुमडे, अविनाश महाजन, सुधाकर मते, गणेश गोठले,आदींनी दिला आहे.
योगेश बन
कार्यवाह, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद नागपूर विभाग.मो.9823044403.