स्थानिक बेरोजगारांच्या प्रश्नासाठी शिष्टमंडळाची जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांच्या सोबत बैठक संपन्न.

प्रतिनिधी:चैतन्य कोहळे, भद्रावती

स्थानिकांना तात्काळ रोजगार देण्याची भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखडे यांची मागणी.

मागणीची लवकरच पूर्तता करू जिल्हाधिकारी साहेब चंद्रपूर यांचे आश्वासन.

चैतन्य कोहळे, भद्रावती- कर्नाटका एम्टा कोल माईन्स मध्ये स्थानिक बेरोजगारांना रोजगार न देण्याच्या मुद्द्यावर नागरिकांमध्ये रोष आहे. यामध्ये आता माननीय आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मध्यस्थीने आज जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे शिष्टमंडळ आणी जिल्हाधिकारी यांची बैठक संपन्न झाली त्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी स्थानिकांना लवकरच योग्य तो न्याय देऊ असे आश्वासन दिले. यावर भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखडे यांनी सांगितले कि, जोपर्यंत स्थानिकांना रोजगाराचा प्रश्‍न व स्थानिकांच्या समस्या सोडवल्या जाणार नाही तोपर्यंत पाठपुरावा सुरू राहील व लवकर स्थानिकांना रोजगार न मिळाल्यास स्थानिक बेरोजगारांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला.
वानखेडे यांनी हे ही सांगितले की कर्नाटका एम्टा कोल माईन्स मध्ये मनमाना कारभार चालू आहे. त्याबद्दल ची नाराजी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना समोर व्यक्त केली. तसेच कोल ट्रान्सपोर्ट करताना तेथील जवळपासच्या ग्रामस्थांना रस्त्यावरील धुळीचा व रस्त्याचे कोणतेही नियोजन न करता राजरोसपणे कोळशाची वाहतूक केल्या जात असल्याबद्दलही त्यांनी अधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली.
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पटवून दिले की यापूर्वीच्या शेतीवर पाचशे स्थानिक महिलांना रोजगार मिळत होता पण खान नियमितपणे सुरू झाल्यामुळे त्यांचा रोजगार गेला आणि त्यांच्या मुलांनाही कोणत्याही प्रकारचा रोजगार मिळत नसून तेथील जनतेवर उपासमारीची वेळ आलेली आहे. या सर्वस्वी घटनेला कर्नाटका एम्टा खान प्रशासन हे जबाबदार आहे.
तसेच वानखेडे बोलले कढोली ग्रामपंचायतीचा आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा कर दिलेला नसल्याने तो तात्काळ कंपनीने ग्रामपंचायतीला द्यावा यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी यांना मागणी केली. व जिल्हाधिकारी यांनी आश्वस्त केले की कर न देणे हे कंपनीचे चुकीचे असल्याबाबत मान्य करून त्यांना तात्काळ कर भरायला लावू असे सांगितले.
स्थानिक प्रशासन कोणतीही समस्या घेऊन केल्यास प्रतिसाद देत नसल्याबाबत नाराजी व्यक्त केली.
तसेच वानखडे यांनी आरोप केला की कंपनीने काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांना साथीला घेऊन मुजोरी ने कारभार चालवत असलल्याबद्दल जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सांगितले. यावेळेस भायुमो चंद्रपूरचे जिल्हा उपाध्यक्ष आकाश वानखडे, विस्मय बहादे, चैतन्य कोहळे, गणेश खरवार, जसवंत सिंग, शिवशंकर मडावी व तसेच शिष्टमंडळातील पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.