धक्कादायक:2018-2019 मध्ये किनवट पंचायत समितीने 30 हुन अधिक ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांची वेतने केली गड़प? 30 ग्रामसेवक 2 विस्तार अधिकारी यांच्या सह BDO आणि CO प्रकरणात समाविष्ट असल्याच्या चर्चेस उधान?

सहसंपादक:प्रशांत विजय बदकी

किनवट तालुक्यात राहण्याची इच्छा येथील नागरिकांची कमी आणि कर्मचारी यांची जास्त आहे या मागील कारण असे आहे की नागरिकांना सुविधा मिळत नसल्याने नागरिक स्थलांतर करत आहेत .
आणि कर्मचारी यांना योजनेत स्वत ची पोळी भाजायला मिळते म्हणून कर्मचारी यांना इथेच राहयला आवडते .
2018-2019 मध्ये पंचायत समिती किनवट अंतर्गत येणाऱ्या 30 हुन अधिक ग्राम पंचायत मध्ये अवैध रित्या काही लोकांची नेमणुक पंचायत समिती कडून करण्यात आली आणि
सदर नेमणुक करुन पगारी खाते दुसऱ्याचे देण्यात आले असल्याची चर्चा समोर येत असून
सदर भ्रष्टाचारामध्ये 30 हुन अधिक ग्राम सेवक ,2 विस्तार अधिकारी यांच्या सह बी डी ओ आणि सी ओ अधिकारी असल्याचे ऐकायला मिळत आहे.वरिष्ठ अधिकारी यांच्या कडून प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागनी जनतेतुन होत आहे