अल्ट्राटेक सिमेंट कंपनीकडून रस्त्याच्या कामात व्यथ मुख्यमंत्री सडक योजना काम रेगांळले ?

प्रतिनिधी:अंशुल पोतनूरवार, कोरपना

गडचांदूर-माणिकगड पहाडावरील दहा गावाशी नाळ जोडणारा मुख्यमंत्री सडक योजनेतून 18 19 वित्तीय वर्षात मुख्यमंत्री सडक योजने मधून नोकरी लिंगणडोह कुसूंबी पेद्दा आसापूर जिवती या गावाशी डोंगरी भागातून रस्ता निर्माण करण्यात आला काही ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात आले मात्र पूर्वीच्या माणिकगड सिमेंट व सध्याच्या अल्ट्राटेक सिमेंट या कंपनीने निजाम काळातील अस्तित्वातील रस्ता संपूर्ण खदानी मध्येच रस्त्यालगत खोदकाम केल्यामुळे अनेक वाटसरू ना जीव धोक्यात टाकून जावे लागते कंपनीने सार्वजनिक रस्त्यावरच बिना परवानगीने कन्वर्ट बेल्ट रोपवे व क्रेशर मशीनचे लोखंडी राड वापर करून रस्त्यावरचे अतिक्रमण केले आहे त्यामुळे वहिवाटीच्या रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याने अनेक तक्रारी नागरिकांनी महसूल प्रशासनाकडे केले मात्र दहा गावाशी जोडणारा मुख्य रस्ता कंपनीच्या मुजोरी ने अर्धवट पडला असून वाहतुकीसाठी नागरिकांना गैरसोयीचा आहे कंपनीने बॉम्बे जरी येथील चुनखडी उत्खननासाठी जड वाहतूक त्या रस्त्याने करते तसेच ज्या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले ही जमीन कंपनीने कायदेशीर शासनाकडून प्राप्त करून घेतलेली नाही असे असताना मात्र कंपनीने आपल्या वाहनाच्या वाहतुकीकरिता स्वतंत्र रस्ता तयार केला व सार्वजनिक रस्त्यावर शासनाच्या परवानगी शिवाय अनाधिकृत सुरक्षा गार्ड तपासणी नाके बसविले यामुळे लोकांना जाण्या येण्याकरिता कमालीची कसरत करावी लागते निस्तार पत्रकानुसार महसूल दरबारी नोंदी असताना कंपनीची ही मुजोरी महसूल प्रशासन गप्प का यापूर्वी नागरिकांनी केलेल्या आंदोलनामुळे तहसीलदार राजुरा यांनी दिनांक सात जुलै 2020 ला आदेश पारित करून तात्काळ रस्ता खुला करावा असा आदेश दिला मात्र वर्ष लोटूनही सिमेंट कंपनी व मंडळ अधिकाऱ्यांनी याची अंमलबजावणी केली नाही दिनांक 17 8 1981 च्या लीज करार करताना शासनाने भाडेपट्टी धारकाला सार्वजनिक रस्त्यावर काम करता येणार नाही असे नमूद असतानासुद्धा माणिकगड सिमेंट कंपनी रस्त्यावर ठिकाणी अडथळे निर्माण केले याबाबत अनेक तक्रारी करूनही शासनाने दखल न घेतल्याने आता आंदोलन करण्याचा निर्णय या परिसरातील नागरिकांनी केला आहे कंपनीच्या खदानी परिसरामध्ये सुरक्षेचा अभाव असल्यामुळे अनेक वन्यप्राण्यांना व पाळीव प्राण्यांना चुनखडी दगडाचा माराने दुखापत होत असल्याने शेतकऱ्यांना नुकसानीचा फटका बसत आहे नुकत्याच झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ता तूट झाल्याने नागरिकांना दुसऱ्या रस्त्याने जाण्याची पाळी आलेली आहे कंपनीने सार्वजनिक रस्ताच हडपल्या मुळे परिसरातील नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे महसूल अधिकारी यांनी अडवलेल्या रस्त्याचे बांधकाम तातडीने सुरू करण्यासाठी कारवाई करावी तसेच निस्तार पत्रकातील सार्वजनिक रस्त्यावर कंपनीने अनाधिकृत केलेले बांधकाम पाडल्याची मागणी जन सत्याग्रह संघटनेचे सय्यद आबिद अली बाबुराव जुमनाके शंकर आत्राम भाऊराव कन्नाके भोजू आत्राम यांनी दिनांक सात जुलै 2020 च्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 161 165 अन्वय झालेल्या आदेशाची तातडीने अंमलबजावणी करावी अशी मागणी उपविभागीय अधिकारी राजुरा यांच्याकडे केली आहे