वेकोलीचा सुल्तानी कारभार,माजरीवासी पडत आहे प्रदूषणाला नाहक बळी

वेकोलीच्या कारभाराने माजरीवासी त्रस्त, जन आंदोलनाचे आयोजन

माजरीवासीयांच्या विविध समस्यांना घेऊन आंदोलनाचे आयोजन

प्रतिनिधी:- चैतन्य कोहळे –

माजरी वासियांचा वेकोलिच्या कारभारामुळे त्रास दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आता तेथील जनता नव्हे तर लहान मुलं पण त्रस्त झालेले आहेत. वेकोलि जवळ सी एस आर फंड असतानाही माजरी तील जनतेला ब्लास्टिंगच्या हादऱ्या मुळे झालेले नुकसान भरपाई अजुनीही देण्यात आलेला नाही. माजरी तील जनतेच्या वीज आणि पाणी समस्या दिवसेंदिवस वाढत चाललेले आहे. वर्धा नदी जवळील गाव असतानाही वेकोली माजरी ग्रामवासी यांना पूर्णपणे पाणी पोहोचू शकत नाही. व त्यांचे पाणी कनेक्शन वारंवार कापले जातात. तेथील जनतेला रस्त्यावर मोकाट फिरणे पण धोकादायक ठरत आहे वेकोलिचे जड वाहन बाजरीतील मुख्य रस्त्यावर चक्क बाजार ओळीतून जायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे तेथील लहान शाळेतील ये-जा करणाऱ्या मुलांचे जीव धोक्यात येत आहे. खानीच्या प्रदूषणामुळे त्रास तर होताच पण आता ये-जा करणाऱ्या या जवळ वाहनामुळे प्रदूषणाचे प्रमाणही फार वाढत चालले आहे. तेथील सुशिक्षित तरुण यांच्याकडे जवळ पाच ते सहा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असताना आणि सत्तर टक्के स्थानिकांना रोजगार देणे हा कायदा असताना. गावातील सुशिक्षित तरुणांना बाहेर काम करायला जावे लागत आहे. तेथील मुख्य महाप्रबंधक यांनी 66 केवी विद्युत घर असताना त्याला कमी करून त्यात 33 केवी करून तेथील जनतेचे लाईन कनेक्शन काढून टाकण्यात आले आहे. खूप निवेदन करून फक्त रात्रीच्या वेळेला लाईन चालू ठेवण्यात येते ज्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे फार मोठे नुकसान झाले आहे. या सर्व जाचाला त्रासून माजरी तील सर्व जनतेने एकमताने ठरवले की जनआंदोलन हाच शेवटचा मार्ग राहील. यासाठी गुरुवार दिनांक 15/08/2021 रोजी वेकोलि प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचे ठरविले आहे.