लोधी समाजाच्या गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न दहावीत यशस्वी तर बारावीत ऋतुजा प्रथम

आलोक कर्मचारी संघटनेचे आयोजन

तालुका प्रतिनिधी/१० ऑगस्ट:ऋषिकेश जवंजाळ


काटोल – अखिल भारतीय लोधी लोधा अधिकारी- कर्मचारी संघ, (आलोक) महाराष्ट्र राज्य तर्फे काटोल – नरखेड तालुक्यातील दहावी व बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा नुकताच पंचवटी, काटोल येथे पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आलोक प्रदेशाध्यक्ष अनंतलाल दमाहे तर प्रमुख अतिथी म्हणून प्रदेश सचिव गजानन मोरोलीया, कोषाध्यक्ष ज्ञानेश्वर दमाहे, रमेश बिरनवार, विजय बघेले, सुभाष नोरोलीया, राजू मुरोडीया, चंद्रशेखर खरपुरीया, वामन खजुरीया प्रामुख्याने उपस्थित होते.
दहावी परीक्षेत यशस्वी चंद्रशेखर खरपुरीया (९८.४०), यशस्वी सुखदेव चौधरी (९६.२०), प्राची वामन खजुरीया (९१.८०), प्राची संदेश पडोलीया (९०.४०) तसेच बारावीच्या परीक्षेत गुणवंत ठरलेले ऋतुजा ताराचंद बासेवार (९२.००), रेश्मा भगीरथ पडोलीया (९१.८५), युक्ती राजेंद्र मुरोडिया (९०.१६), हर्षाली गणेश पेरोडिया (८९.००), ईशाराणी कैलाश खरपुरीया (८५.८९), मोहित प्रताप खरपुरीया (८५.८३) इत्यादी विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ देऊन अतिथींच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रताप खरपुरीया, संचालन एकनाथ खजुरीया तर आभार प्रदर्शन योगिता खरपुरीया यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी गणेश पेरोडिया, सुखदेव चौधरी, मोतीलाल खरपुरीया, ममता बासेवार, विजया खरपुरीया इत्यादींनी परिश्रम घेतले
.