
राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
राळेगाव तालुक्यात काही प्रमाणात डेंगूचे पेशंट आढळले असून धानोरा गावात सुद्धा डेंगूचे पेशंट आढळत असल्यामुळे या आजाराचा जास्त प्रमाणात प्रसार होऊ नये म्हणून याला प्रतिबंधक म्हणून धानोरा ग्रामपंचायतीच्या सरपंचा सौ. दिक्षाताई प्रवीणराव मुन , उपसरपंच विशाल भाऊ येणोरकर व सर्व ग्रामपंचायत सदस्याच्या उपस्थितीत फवारणी करण्यात आल्याने धानोरा येथील नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून अशाप्रकारचे जनतेच्या हिताचे उपक्रम राबवत असल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
