राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)
महाराष्ट्र प्रदेश किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद भाऊ पवार यांना काँग्रेस पक्षातर्फे आणखी एक महत्वाची जबाबदारी देण्यात आली असून नुकत्याच झालेल्या निवडीमध्ये महाराष्ट्र राज्यातील महासचिवांमध्ये ( General Secretary) त्यांचा समावेश करण्यात आला आहे. पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल देवानंदभाऊ पवार यांनी आभार व्यक्त केले आहेत. काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष मा.सोनियाजी गांधी, मा.राहुलजी गांधी, राष्ट्रीय महासचिव मा.के.सी.वेणूगोपालजी, काँग्रेस महाराष्ट्र प्रभारी मा.एच.के.पाटील साहेब, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या मार्गदर्शनात पक्षासाठी कार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.