अडेगावं खडकी रस्ता संपूर्ण काँक्रेटिकरण करून देण्या करीता खड्यात बसलेल्या उपोषणातील युवकांनी जिल्हा अधिकारी साहेबाना लिहिले रक्ताने पत्र

जिल्ह्याअधिकारी याना लिहले रक्ताने पत्र

यवतमाळ जिल्ह्यातील टोकावरील झरी-जामनी तालुक्यातील गौनखनिजाने व्यापलेले अडेगाव- खडकी-गणेशपुर या रस्ता साठी अनोखे खड्यात उपोषण सुरू आहे हेच मागण्या प्रश्न शासन दरबारी मांडण्याकरिता लक्ष वेधण्यासाठी आज उपोषणकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून जिल्हाधिकारी साहेब यांना पाठवून मागणी ची दखल घ्या विनंती केली तसे या परिसरात मोठ्या खदानी आहे या खदानींचें मोठी 5वाहतूक ही खडकी मार्गे अडेगाव या रस्त्याणी चालत असतात या परिसरात जगती मिनरल्स,ईशान मिनरल्स,सूर्या मिनरल्स,गुंडावार मिनरल्स,मोनेट इसपात,व इतर गिट्टी खदानी चे मोठी वाहतूक ही अडेगाव रस्त्याणी जाते या रस्त्याची मर्यादा फक्त दहा टनची असताना या रस्त्यावरून खदानी चे मोठी जड वाहतूक होते यामुळे अडेगाव -खडकी रस्ता संपूर्ण खराब झाला असून
प्रशासनाला वारंवार पत्र व्यव्यार करून सुद्धा प्रशासन या मागणी कडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून या परिसरातील जड वाहतूकीमुळे संपूर्ण कंपनीने रस्ता खराब झाला आहे तरी अनेक दा मागण्या करून सुद्धा
रस्ता न झाल्याने अडेगाव येथील युवा नेतृव मंगेश पाचभाई यांच्या नेतृत खडकी बस स्थानकाच्या बाजूला अनोखे खड्यात उपोषण सुरू आहे
या उपोषणात तिसरा दिवशी मुडन चोथा दिवशी रास्ता रोको असे अनेक मुद्दे आहे यामुळे हे उपोषण आक्रमक होण्यार असल्याची चर्चा परिसरात आहे
प्रशासन या कडे काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे
या उपोषणात अडेगाव येथील राहुल ठाकूर,दत्ता लालसरे,गिरीधर राऊत,दिनेश जीवतोडे,निखिल देठे,दत्ता भोयर व इतर उपोषण करते असतील