राळेगाव तालुक्यातील अंतरगाव येथे डेंगू प्रतिबंधात्मक फवारणी संपन्न

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुक्यात काही प्रमाणात डेंगूचे पेशंट आढळले असून अंतरगाव या गावात कर्तव्यदक्ष सरपंच प्रवीण भाऊ येंबडवार उपसरपंच महेंद्रजी उमरे, ग्रामपंचायत सदस्य कविताताई पेंदोर , वैशालीताई नागोसे , सुनिताताई तोमर, जयाताई ठाकरे, पल्लवी ताई दांडेकर यांनी गावाचे आरोग्याची काळजी घेऊन डेंगू आजाराचा जास्त प्रमाणात प्रसार होऊ नये म्हणून याला प्रतिबंधक म्हणून फवारणी करण्यात आली. त्या वेळी ग्रामपंचायत सरपंच प्रवीण भाऊ येंबडवार उपसरपंच महेंद्रजी उमरे, कविताताई पेंदोर , वैशालीताई नागोसे , सुनिताताई तोमर, जयाताई ठाकरे, पल्लवी ताई दांडेकर सर्व ग्रामपंचायत सदस्य व व ग्रामसेविका खैरकार मॅडम व ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत गावातील नागरिक विजयराव बुरले, गणेशराव येंबडवार गणेशराव बुरले, वाल्मीकराव नागपुरे योगेशजी वनारसे हे उपस्थित होते. फवारणी करण्यात आल्याने अंतरगाव या गावातील नागरिकामध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून अशाप्रकारचे जनतेच्या हिताचे उपक्रम राबवत असल्यामुळे सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.