राळेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून पिक विमा व इतर आर्थिक मदत द्या मनसे तालुकाध्यक्ष शंकर भाऊ वरघट यांच्या नेतृत्वात निवेदन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

राळेगाव तालुका ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून पिक विमा व इतर आर्थिक मदत द्या आणि ई पिक पाहणीसाठी शेतकऱ्यांची येणारी अडचण लक्षात घेवुन ई पिक पाहणी अँप सक्तीचे न करता ऐच्छिक करण्यात येवुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राळेगाच्या वतीने उपविभागीय अधिकारी व तालुका कृषी विभाग यांना सडलेल्या कपाशीचे बोंडांची टोपली भेट देण्यात आली व उपविभागीय अधिकारी साहेब राळेगाव यांच्यामार्फत मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेबयांना निवेदन देण्यात आले. यावेळेस मनसेचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.