

माहागाव प्रतीनीधी :- संजय जाधव
महागाव तालुक्यातील मोठे बाजारपेठ असलेल्या
प्राथमिक आरोग्य केंद्र फुलसावंगी येथे जवळपासच्या मराठवाडा माहूर तालुक्यातून व परिसरातील ३० ते३२ गावातून गरोदर महिला प्रसुती करण्याकरिता येतात. आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी प्रसुतीसाठी आलेल्या गरोदर महिलांना इतरत्र न पाठवता आपल्याच केंद्रातच प्रसुती करण्याचे कार्य करतात. आरोग्य केंद्रान अधिकारी व कर्मचारी प्रमुतीपूर्व व प्रसुतीपश्चात योग्य काळजी व सेवा पुरवित असल्याने गरोदर महिला फुलसावंगी केंद्राला प्रथम प्राधान्य देतात.
प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकिय अधिकारी डॉ. विठ्ठल सल्लावार वै.अ. डॉ. भंडारी, ,डॉ. वाटोरे आणि G.N.M. वारे, बागडे व इतर आशा कर्मचा-यांच्या कर्तव्यदक्षपणा तसेच रुग्नांशी आपुलकीच्या संबंधामुळे आरोग्य केंद्र फुलसावंगी येथील कर्मचाऱ्यां मुळेच व प्रसूतीच्या बाबतीत जिल्ह्यातून प्रथम आले असुन संपुर्ण परिसरातून वैद्यकीय अधिकाराचे व संपूर्ण कर्मचाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
