
हिमायतनगर प्रतिनिधी
हिमायतनगर तालुक्यातील मौजे जवळगाव येथिल भुमी पुत्र अक्षय पांडूरंग रावते यांची भारतीय सैन्य दलात मध्ये नियुक्ती झाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतिने आज जवळगाव येथिल नागरीकांनी भव्य दिव्य अशी ढोल ताशा पथक स्वरुपात त्याचे स्वागत करण्यात आले त्याचबरोबर सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले होते या कार्यक्रमास उपस्थित हदगाव हिमायतनगर मतदार संघाचे आमदार माधवराव पाटील जवळगावकर तर लोकनेते बाबुराव पाटील कोव्हळीकर यांची देखील उपस्थित होती अक्षय यांनी कोरोनाच्या काळामध्ये देखील आपली ट्रेनिंग पुर्ण करुन भारतीय सैन्य दलात आपली वर्णी टिकुन ठेवली आज त्यांच्या आई वडील यांच्या मध्ये एक वेगळा आनंद पहावयास मिळाला आहे ज्याचामुळे संपुर्ण देशातील नागरिक सुख शांती समाधानकारक जीवन जगत आहेत त्याचे रक्षण करण्यासाठी अक्षय पांडूरंग रावते यांना संधी मिळालीआहे त्यांचे कारण आई वडील यांची शिकवण कारण रात्रंदिवस शेती मध्ये काबाडकष्ट करून त्यांचा शिक्षणला पैसा पुरवला आहे त्याचे फळ आज मिळाले आहे असे व्यकतव्य वडीलाने केलें आहे यावेळी कार्यक्रमाला उपस्थित आमदार माधवराव पाटील जवळगावकर बाबुराव पाटील कोव्हळीकर हदगाव भाजपा तालुकाध्यक्ष निळू पाटील सरसम येथिल मुख्याध्यापक गजाननराव सुर्यवंशी काँग्रेस शहराध्यक्ष संजय माने ग्रामसेवक सैलेश जोशी मंडळी अधिकारी कदम बालाजी राठोड विनोद दुर्गेकर जयवंत पतंगे गणेश सुर्यवंशी आदि कार्यकर्ते उपस्थित होते व समस्त गावकरी मंडळी चे आभार मानले गेले आहे
चौकट
भारत मातेचे रक्षण हीच माझी सेवा
अक्षय रावते भारतीय सैनिक
