स्वप्नाकडे वाटचाल करण्याकरिता वेडे व्हा – जाधव,जि.प.स्पर्धा परीक्षा केंद्राचा ‘ग्रेट भेट’ उपक्रम

वेडी माणसचं इतिहास निर्माण करतात – पोलीस विभागीय अधिकारी नागेश जाधव

तालुका प्रतिनिधी/१९ ऑक्टोबर
काटोल – मनापासून केलेल्या गोष्टीसाठी कुणीही अडवू शकत नाही.म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा प्रचंड मेहनत करा.आयुष्याचं ध्येय निश्चित करा.व ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी वेडे व्हा तेव्हाच यश मिळेल.वेडी माणसे इतिहास निर्माण करतात हाच विश्वाचा इतिहास आहे असे प्रतिपादन काटोल उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव यांनी ‘ग्रेट भेट’ उपक्रमांतर्गत जि.प.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व अभ्यास केंद्र, काटोल येथे केले.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी नागेश जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक पुनम कोरडे – क्षिरसागर , गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, केंद्र समन्वयक एकनाथ खजुरीया, केंद्रप्रमुख योगेश चरडे, उपक्रम संयोजक राजेंद्र टेकाडे प्रामुख्याने उपस्थित होते.
महात्मा गांधी जयंती निमित्त घेण्यात आलेल्या पत्रलेखन स्पर्धेतील अनुक्रमे तीन विजेते शरयू मलमकर, नोमादेवी खुरपडे, गौरव गाढवे यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून अतिथींच्या शुभहस्ते गौरविण्यात आले.
पुढे नागेश जाधव म्हणाले, शहरातील घरात वाढणाऱ्या कुंडीतील फुलापेक्षा रानावनात मनसोक्त फुलणाऱ्या फुलांचा सुगंध दहादिशा दरवळतो.तुम्ही सर्व शेतकरी कुटुंबातील मुलं आहात. आपल्या पालकांच्या कष्टांची परतफेड करण्याकरिता जिद्दीने अभ्यास करून यश मिळवा.’अभी नही तो कधी नही..’ हे सूत्र जीवनात लक्षात ठेवून प्रत्येक संधीचे सोने करण्यासाठी नियोजन करून गटचर्चा करून स्पर्धा परीक्षा दया. यश तुमच्या पदरात पडेल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी संतोष सोनटक्के, संचालन शंतनू महल्ले तर आभार प्रदर्शन आदित्य बाभूळकर यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगणक ऑपरेटर सतिष बागडे, परिचारिका अनुसया रेवतकर, यश जोगेकर, आरती कावडकर, प्रणय महाजन, गुंजन रिठे, प्रितम नाईक, स्वर्णा कोटजावळे, भुपेश बेंडे, धनश्री खसारे,प्रतिक मानेराव, मयुरी गाढवे,हिमांशी भोरे, विशाल शिवणकर, प्रांजली मदनकर आदींनी सहकार्य केले.
K

सर्वच पोलीस भ्रष्टाचारी नाही
यावेळी, विद्यार्थ्यांनी जाधव यांना प्रश्न विचारले त्यांनी मनसोक्त उत्तरे दिली. पोलीस विभाग भ्रष्टाचाराने ग्रासला आहे का ? या प्रश्नाचे उत्तर देतांना जाधव म्हणाले, हाताची पाचही बोटं सारखी नसतात.प्रत्येकांचे अनुभव वेगवेगळे असतात.अनुभवानुसार व्यक्ती तर्क लावून एखादे मत तयार करतो.पोलीस दलात दीड लक्ष पोलीस व पंधरा हजार अधिकारी आहे.यातील अल्पांच्या कृतीमुळे पोलीस दलाकडे संशयाने बघितले जाते.
कठीण प्रसंगी शांत राहिलात, तोल घसरू दिला नाही तर योग्य निर्णय घेऊ शकाल. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असेल तर जीवनात आनंदीत राहाल.