
राळेगाव तालुका प्रतिनिधी:- रामभाऊ भोयर (9529256225)
मारेगाव पोलीस ठाणेत नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. राजेशजी पुरी यांना प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र राज्य तालुका मारेगावच्या वतीने स्वागत करण्यात आले.
प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हा सरचिटणीस सचिनभाऊ काकडे यांच्या उपस्थितीत संघाचे मारेगाव तालुका अध्यक्ष अनंतरावजी गोवर्धन यांच्या हस्ते नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री. राजेशजी पुरी यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. आणि त्यांच्याशी विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक राजेशजी पुरी म्हणाले की, पोलीस प्रशासन व पत्रकार यांनी एक-मेकास सहकार्य करणे गरजेचे आहे. कारण पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. त्यामुळे पत्रकारांनी समाजहितासाठी सहकार्य करणे गरजेचे असते. तालुक्यातील शांतता व सुव्यवस्था कायम राहणे महत्वाचे आहे.
याप्रसंगी संघाचे तालुका उपाध्यक्ष पंकजभाऊ नेहारे, तालुका सचिव सचिनभाऊ मेश्राम, सहसचिव सुदर्शनभाऊ टेकाम, सल्लागार अमोलभाऊ कुमरे, मार्गदर्शक राजूभाऊ डवे, संघटनेचे सदस्य व पत्रकार रोहनभाऊ आदेवार,आनंदभाऊ नक्षने, पत्रकार सूरजभाऊ झोटिंग, पत्रकार सुमितभाऊ गेडाम, पत्रकार विवेकभाऊ तोडसे पत्रकार सुरेशभाऊ पाचभाई आदी पदाधिकारी व पत्रकार उपस्थित होते.
