दंगलखोरांना पाठीशी घालणाऱ्या व सामान्यांना वेठीस धरणाऱ्या निष्क्रीय महाविकास . आघाडी सरकारचा जाहिर निषेध :- आमदार प्रा डॉ अशोक उईके यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन

राळेगाव तालुका प्रतिनिधी:-रामभाऊ भोयर (9529256225)

   

त्रिपुरा राज्यात १२ डिसेंबरला एका समूहाच्या मशिदीची नासधूस झाल्याची खोटी व्हिडीओ क्लिप व्हायरल करून साम्प्रदाईक दंगली घडू पाहणाऱ्या व या घटनेशी संबंध नसतांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याना व सामान्य मानसांना पोलीसी धाक दाखवून खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या सरकारचा तसेच अतिवृष्टी ने शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे . त्यांना अद्यापही अनुदान मिळाले नाही शेतकर्यां च्या शेतातील विज कापणाऱ्या सण उत्सवाच्या काळात ग्रामीण भागातील लोकांना अंधारात ठेवण्याचे पाप करणाऱ्या निष्क्रिय महाविकास आघाडी सरकारचा जाहिर निषेध आमदार प्रा डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वान राळेगांव कळंब बाभूळगांव भारतीय जनता पार्टीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन करून निषेध करण्यात आला . त्रिपुरा मध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसतांना जगात इतरत्र कुठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची ‘ क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रातील मालेगांव अमरावती नांदेड व पुसद येथे ज्या दंगली झाल्या . अमरावती इतरही शहरात विस ते चाळीस हजार लोकांचा जमाव रस्त्यावर एकत्र आला कसा व या जमावाने दुकाने कार्यालये वाहने दिसेल ते जाळ पोळ करण्याचे काम केले प्रचंड तोड फोड केली ही घटना अमानवी आहे . मानवी प्रवृत्तीला शोभनारी नाही . या घटनेला भारतीय जनता पार्टी निषेध करीत आहे . एका विशिष्ट समूहाच्या जमावाने केलेल्या हिसांचाराची उत्सपूर्त प्रतिक्रीया म्हणून अमरावतीकर रस्त्यावर उतरले त्यांच्यावर हल्ले करणे किती योग्य आहे या सर्वच दंगलीची चौकशी न्यायालयाली समिती करून त्यांच्या देखरेखी खाली व्हावी पोलीस विभागाने निपक्ष पाती पणे चौकशी करणे गरजेचे असतांना पोलीस प्रशासन दंगलखोरांना पाठीशी घालत आहे . अशाने या विभागाची प्रतिमा मलीन झाल्या शिवाय राहणार नाही . यवतमाळ जिल्ह्यात या वर्षी अतिवृष्टी झाली शेतकऱ्यांन मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे अद्याप नुकसान भरपाई चा एक रुपया ही मिळाला नाही . उलट त्यांच्या शेतातील विज प्रवाह कापला असे हे सरकार ग्रामीण भागातील पथदिवे दोन महिन्या पासून बंद आहे गांव अंधारात व आपण उजेडात ठेवणाऱ्या महाराष्ट्रातील निष्क्रीय महाविकास आघाडी सरकार चा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आमदार प्रा डॉ. अशोक उईके यांच्या नेतृत्वात उपविभागीय कार्यालया समोर धरणे आंदोलन करुन निषेध करण्यात आला . या वेळेस भाजपा तालुका अध्यक्ष तथा जि प सदस्य चितरंजन कोल्हे जिल्हा परिषद सदस्या प्रिती काकडे भाजपा जिल्हा सरचिटणीस ऍड प्रफुल चव्हाण शहर अध्यक्ष डॉ. कुणाल भोयर कळंब तालुका प्रमुख कैलास बोन्द्रे राळेगांव प स सभापती प्रशांत तायडे माजी नगराध्यक्ष बबन भोगांरे सौ छाया ताई पिपंरे सौ वनिता दुर्गे डॉ . सविता पोटदुखे सौ संतोषी राजजी वर्मा सौ येडस्कर ताई. बाभूळगांव भाजपा तालुकाअध्यक्ष सतीष मानलवार .मुन्ना लाखियाँ संदीप वैद्य. विनोद बोरतवार विवेक दौलतकर.गजानन लढी. विनोद मांडवकर. संजय काकडे ,विशाल पंढरपुरे.रंजित ठाकरे.मनोज काळे.दिनेश वानखेडे.अरुण शिवणकर संदिप तेलंगे आशिष इंगोले सागर वर्मा विनायक महाजन कार्यकर्त मोठ्या प्रमाणात उपस्थीत होते.