कोविड रुग्णांच्या नातेवाईकांना मनसेच्या वतीने मोफत भोजन सेवा, रुग्णांच्या मदतीसाठी मनसे सैनिकांचे अहोरात्र परिश्रम


वाशिम :जिल्हयात कोरोनाचा वाढत्या उद्रेकामुळे शासकीय आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. शासकीय यंत्रणेला हातभार म्हणून अनेक समाजसेवी संघटना आणि पक्ष आपआपल्या परीने पुढे येवून रुग्णांना विविध प्रकारे मदत करीत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शासकीय स्त्री रुग्णालयातील गोरगरीब कोविड रुग्णांना उपचार सुरु आहे त्याच्या नातेवाईक याना वेळेवर भोजन मिळावे म्हणून २७ एप्रिलपासून मोफत भोजन सेवा सुरु करण्यात आली आहे. यासंदर्भात रुग्णालयातील ४० ते 60 रुग्णांच्या नातेवाईक यांना दररोज जेवणाचे डबे पुरविण्यात येत आहेत. ही सेवाभावी संकल्पना मनसेचे संस्थापक राज ठाकरे यांच्या सुचनेनुसार, राज्य उपाध्यक्ष राजुउंबरकर, सरचिटणीस विठ्ठल लोखंडकर, आनंद एबंडवार यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रभारी जिल्हा अध्यक्ष मनिष डांगे यांच्या पुढाकारातुन सुरु करण्यात आली आहे. २७ एप्रिल रोजी मनसेच्या अकोला नाका स्थित राजगर्जना जिल्हा कार्यालयात अ‍ॅड. नामदेवराव जुमडे यांच्या उपस्थितीत ही सेवा कार्यान्वीत करण्यात आली. मनसेच्या प्रयत्नामुळे भाग्यश्री सावके, शारदा भिसडे, गजानन सुरोशे या रुग्णांना जिल्हा स्त्री रुग्णालयात वेळेवर बेड मिळाले आहेत. यासोबतच रूग्णांना वेळेवर रेमिडीसीविर इंजेक्शन, हॉस्पीटलमध्ये ऑक्सीजन बेड त्वरीत मिळावे यासाठी मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते धावपळ करुन रुग्णांना मदत करुन त्यांचा जीव वाचवित आहेत. शासकीय रुग्णालयासाठी लागणारे फार्मही मोफत देण्यात येत आहेत. मनसेच्या या सेवाभावी कार्यामुळे गोरगरीब रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पवित्र कार्यामध्ये मनसे सैनिक मोहन कोल्हे, मोहंमद नैरागाबादी, गजानन वैरागडे, प्रतिक कांबळे, राजु शिराळ, समाधान खरे, देवानंद खरे, श्री देशमुख, वेदांत ढवळे, सुहास जाधव, सतिश कडवे, मनिष महल्ले, संतोष पवार, बेबीताई धुळधुळे, अरुण बाबा प्रतिष्ठानचे वैभव अवचार आदी अथक परिश्रम घेत आहेत.